पुणे म्हाडातर्फे ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे मागच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये कोरोनाची परिस्थिती असताना देखील अनेक ठिकाणी पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई या ठिकाणी मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम म्हाडामार्फत झालं. याबाबत गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.
(हेही वाचा – राज्यात ‘या’ १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू)
म्हाडाची आज पुणे येथिल लॉटरी बाबत अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे. मागच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये कोरोनाची परिस्थिती असताना देखिल अनेक ठिकाणी पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई या ठिकाणी मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच काम म्हाडामार्फत झालं.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 24, 2022
या भागात ४,७४४ घरांची सोडत
पुण्यात प्रामुख्याने येरवडा, कसबा पेठ, महंमदवाडी, केशवनगर, मुढंवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगाव, वाघोली, पाषण खराडी, वाकड, थेरगाव, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि पुनावळे या भागात म्हाडा या ४,७४४ घरांची सोडत काढणार.
जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले होते. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे
Join Our WhatsApp Community