या वर्षी मुंबईकरांची यंदाची दिवाळी आणखी खास होणार असल्याचे दिसतेय. कारण म्हाडाकडून मुंबईकरांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळणार आहे. दिवाळीत म्हाडाच्या तब्बल ३ हजार घऱांची सोडत निघणार असून या संदर्भातील घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच त्यांनी ट्विट करून ही माहिती देखील दिली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न असणाऱ्यांचे हे गृह स्वप्न लवकरच साकार होणार आहे. यंदाची दिवाळी ही अनेकांसाठी आपलं हक्काचं घर घेऊन येणार आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत ३ हजार घरांची सोडत निघेल, असे ट्विट गुरूवारी जितेंद्र आव्हान यांनी केले आहे.
पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल #विकास_गतिमान_विभाग_गृहनिर्माण pic.twitter.com/JzbzPV8u3L— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 2, 2022
काही दिवसांपूर्वीच म्हाडाने उत्पादन मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे यावेळी जास्त पैसे भरण्याची तयारी मात्र मुंबईत हक्काचं घर घेण्यासाठी ठेवावी लागणार आहे.
किती असेल नव्या घरांसाठी उत्पन्न मर्यादा
- अत्यल्प गट – वार्षिक ६ लाख रूपये
- अल्प गट – वार्षिक ६ लाख १ रूपये ते ९ लाख रूपये
- मध्यम गट – वार्षिक ९ लाख १ रूपये ते १२ लाख रूपये
- उच्च गट – वार्षिक १२ लाख १ रूपये ते १८ लाख रूपये
किती होती जुनी उत्पन्न मर्यादा
- अत्यल्प गट – प्रतिमहिने २५ हजार रूपयांपर्यंत
- अल्प गट – प्रतिमहिने २५ हजार ते ५० हजार रूपयांपर्यंत
- मध्यम गट – प्रतिमहिने ५० हजार ते ७५ हजार रूपयांपर्यंत
- उच्च गट – प्रतिमहिने ७५ हजार १ रूपयांच्या पुढे