‘म्हाडा’ने दिली खुशखबर! पुण्यात ४७४४ घरांची सोडत तर अंबरनाथमध्ये सर्वात मोठी टाऊनशिप

142

गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या वतीने पुणे विभागातील नागरिकांसाठी ४ हजार ७४४ घरांची ऑनलाइन सोडत लवकरच जाहीर होणार आहे. पुणे शहर, पिंपरी – चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा या सोडतीमध्ये समावेश आहे. म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने – पाटील यांनी ही माहिती दिली.

( हेही वाचा : भारतातील सर्वात लांब आणि सुंदर असे रेल्वे मार्ग! प्रवासासाठी लागतात ८० तास)

गेल्या दोन वर्षात म्हाडाने काढलेली ही चौथी तर या वर्षातील तर पुणे विगासाठी म्हाडाने काढलेली ही दहावी सोडत आहे. पुणे विभागातील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणच्या ४ हजार ७४४ घरांची ऑनलाइन पद्धतीने सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या मुदतीत अर्ज भरता येईल अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

म्हाडा २०० एकरावर टाऊनशिप उभारणार

अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातील सर्वात मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या २०० एकर जागेचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला. लोकसंख्येचा वाढता भार मुंबईला पेलवणार नाही त्यामुळे सध्या डोंबिवलीच्या पुढे अंबरनाथ – बदलापूरला जागा शिल्लक आहेत म्हणून म्हाडाकडून अंबरनाथ येथे मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये ३ हजार घरांची सोडत

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली तसेच मुंबईत दिवाळीमध्ये म्हाडाच्या ३००० घरांची सोडत निघेल अशी माहिती त्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.