बंगाली नाट्यलेखनाचे प्रणेते Michael Madhusudan Dutt

175

बंगाली साहित्य हे चीरतरुण आहे. बंगालीमध्ये अनेक मोठमोठे साहित्यिक, नाट्यलेखक, कवी निर्माण झाले. त्यापैकी एक म्हणजे मायकल मधुसूदन दत्त… (Michael Madhusudan Dutt) त्यांचा जन्म २५ जानेवारी १८२४ रोजी बंगालच्या जेसोर जिल्ह्यातील केशबपूर उपजिल्हामधील सागरदरी या गावात एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब समृद्ध होते. त्यांचं शिक्षण इंग्रजीत झाले. सुरुवातीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बॅरिस्टर होण्यासाठी कलकत्त्यात गेले.

एका ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी १८४३ मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मायकल मधुसूदन दत्त (Michael Madhusudan Dutt) यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात कविता लिहिण्यास सुरुवात केली. हिंदू कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी बिशप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान त्यांनी काही पर्शियन कवितांचा इंग्रजीत अनुवाद केला. आर्थिक अडचणींमुळे १८४८ मध्ये त्यांना बिशप कॉलेज सोडावे लागले. त्यानंतर ते मद्रासला गेले आणि तेथे त्यांना साहित्यरचना करण्याची संधी मिळाली.

पुढे त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि एका फ्रेंच महिलेशी लग्न केले. १८६२ मध्ये ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले आणि १८६६ मध्ये परत आले. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या दरबारात नोकरी पत्करली. १९ वे शतक म्हणजे बंगाली साहित्यात मधुसूदन-बंकिम युग मानले जायचे. मायकल यांचा भावनिक स्वभाव इंग्रजी आणि बंगाली साहित्यातही उतरला. त्यांनी इंग्रजीसह अनेक युरोपीय भाषांचा सखोल अभ्यास केला. ज्यामुळे त्यांना (Michael Madhusudan Dutt) बंगाली रचनांमध्ये अधिक समृद्धी भरण्यासाठी मदत झाली. विशेष म्हणजे संस्कृत आणि तेलगू भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. मायकल यांनी अनेक काव्यरचना, नाटके लिहिली. त्यांना बंगाली नाटकाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.