पावसाळा संपल्यानंतर मुंबईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरुवात होते. पावसाचा महिना संपायला काही दिवस शिल्लक असताना थेट सायबेरियातून एक पाहुणा मुंबईतील भांडुप पम्पिंग स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. काळ्या शेपटीचा पाणटिवळा असे या पक्ष्याचे नाव असून, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नॅचर (आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या नोंदीत संकटग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. पाच दिवसात रशिया ते मुंबईतील भांडुप पम्पिंग स्टेशन अंतर काळ्या शेपटीचा पाणटिवळ्याने पार केले. वेळेअगोदरच दाखल झालेल्या या पक्ष्याबाबत पक्षी अभ्यासकांकडून वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत.
मार्चमध्ये जीपीएस टॅगिंग केलेला स्थलांतरित पक्षी
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरणप्रेमी संस्थेने काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्याला यंदाच्या मार्च महिन्यात जीपीएस टॅगिंग केले होते. काळ्या शेपटीचा पाणटिवळ्या स्थलांतरित पक्षी आहे. हिमालय पर्वतरांगांवरील सायबेरिया, रशिया आणि चीन या देशांत त्याचे मूळ घर आहे. हिवाळ्यात काळ्या शेपटीला पाणटिवळ्या मुंबईतील ठाणे खाडी परिसरात मुक्कामाला येत. मार्च महिन्यात तो आपल्या मायभूमीत परततो. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी ठाणे खाडीतील एका काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्याला यंदाच्या मार्च महिन्यात जीपीएस टॅग केले होते.
एप्रिल महिन्यात या पक्ष्याने ठाणे खाडी परिसर सोडला. सायबेरिया गाठायला या पक्ष्याला जून महिना उजाडला. हा पक्षी हिवाळ्यात येणे अपेक्षित असताना सप्टेंबर महिन्यातच भांडूप पम्पिंग स्टेशनला दिसून आला. जीपीएस टॅग असल्याने शास्त्रज्ञांना पाच दिवसात पक्ष्याने अंदाजे सहा ते सात हजारांचा टप्पा गाठला. मोठ्या प्रवासात पक्षी आकाशातून उंचावरुन प्रवास करतात. त्यामुळे मोठे अंतर कापणे पक्ष्यांसाठी सोपे ठरते. सायबेरिया ते मुंबई हा संपूर्ण प्रदेश जमिनीवरचा आहे. पक्षी अभ्यासकांच्या मते, काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्याने समुद्रावरुन सायबेरिया ते मुंबई अंतर कापण्याची शक्यता नाही. समुद्रावरुन त्यांना जमिनीवरुन उतरुन काही काळ थांबा घेऊन प्रवास करणे शक्य नाही. जमिनीवरच्या प्रवासात कित्येक पक्षी पाच दिवसांत थेट येऊ शकतात. काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्याने पाच दिवसांत कोणत्या भागांत थांबा घेतला, याबाबतची माहिती बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांकडून मिळू शकली नाही.
वेळेअगोदरच पाणटिवळ्या दाखल होण्यामागील कारणे
पक्षी मूळ देशात प्रजननासाठी परतात. लवकर प्रजनन झाले असेल किंवा साथीदारच मिळाला नसेल तर पक्षी वेळेअगोदरच मूळ ठिकाण सोडून स्थलांतर करु शकतो, असा प्राथमिक अंदाज काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्याबाबत पक्षी अभ्यासकांनी वर्तवला. पक्षी वेळेअगोदरच स्थलांतरित मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाल्यास निश्चितच आश्चर्यकारक नाही, असेही मत पक्षी अभ्यासकांनी वर्तवले. पाच दिवसांत सायबेरिया ते मुंबई दरम्यान अंतर पार करताना पक्ष्याने थेट अंतर पार केले की मध्ये काही काळ ब्रेक घेत प्रवास केला. याबाबतच्या तांत्रिक माहितीवर अभ्यास सुरु आहे, असे बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) चे संचालक असे डॉ बिभाष पांड्या यांनी सांगतिले.
Join Our WhatsApp Community