सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात शुक्रवारी सकाळी 6.34 मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस 5 कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
(हेही वाचा – ट्वीटरचा ताबा मिळताच, एलाॅन मस्क यांनी सीईओंना दाखवला बाहेरचा रस्ता)
सातारा परिसरात बसलेला यंदाच्या वर्षातील हा चौथा धक्का आहे. यापूर्वी 8 जानेवारी रोजी या वर्षातील पहिला भूकंप झाला होता. त्यावेळी 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर 1 फेब्रुवारीला 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाने कोयना धरण परिसरा हादरला होता. गेल्या 22 जुलै रोजी दुपारी 1 वाजता कोयना धरण परिसराला भूकंपाचा तिसरा सौम्य धक्का बसला होता.कोयना धरण परिसरात 2021 सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिकाच सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल 128 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये 3 रिश्टर स्केलच्या 119 आणि 3 ते 4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या 9 धक्क्यांचा समावेश होता.
मागील महिन्यातदेखील असाच प्रकारचा धक्का सकाळी 8 च्या सुमारास 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा जाणवला होता. आज, शुक्रवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू (सातारा ता.पाटण) कोयना धरणा पासून 12.8 किलोमीटर अंतरावर होता. या अचानक बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने कोयना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.) हादरला. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस 5 कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी अथवा वित्तहानी झाली नसल्याचे सातारा जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community