पुण्यातील मुळशी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान होताना पहायला मिळत आहे. तसेच अनेक नागरिकांचे देखील स्थलांतर करण्यात येत आहे. त्याच मुळशी तालुक्याच्या धरण भागात मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी इथं सौम्य भूकंपाचे धक्के बसल्याने तब्बल ५०० मीटर जमीन दुभंगली आहे.

(हेही वाचा – ‘खेड-भीमाशंकर’ आणि ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा)

मुळशी धरण भागात असणाऱ्या मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी याठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या स्थितीमुळे साधारणतः पाचशे मीटर लांब भेग पडली आहे. ही भेग पडल्याने टाटा तलावाकडील जमीन एक ते दीड फुटापर्यंत दुभंगली आहे.

जमीन खचण्याचे प्रमाण वाढते

मुळशी तालुक्यात जमीन खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. या घटनास्थळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी घटनस्थळाची पाहणी केली असून हा भाग टाटा धरणाच्या हद्दीत येत असल्याने तात्पुरती मदत करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here