देशात सैन्य भरतीच्या नियमांमध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. भारतीय लष्कर, वायूदल आणि नौदलात आता सैनिकांची भरती ‘टूर ऑफ ड्यूटी’ अंतर्गत केली जाणार आहे. या योजनेअंर्गत भारतीय सैन्य भरतीच्या तिन्ही दलांमध्ये दाखल होण्यासाठी नवीन प्रणालीत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टूर ऑफ ड्यूटीच्या अंतिम आराखड्यावर चर्चा सुरु आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाऊ शकते.
असा आहे नवा नियम
या नव्या नियमानुसार, सैन्यात 4 वर्षांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर सर्वांना निवृत्त करण्यात येईल. परंतु त्यातील 25 टक्के कर्मचा-यांना पुन्हा पूर्ण सेवेसाठी शाॅर्टलिस्ट करण्यात येईल. टूर ऑफ ड्यूटी योजनेच्या अंतिम मसुद्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते. कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांत लष्करात भरती होऊ शकली नाही. तिन्ही सैन्य दलांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत, ती भरण्यासाठी लवकरच सैन्यात भरतीची घोषणा केली जाणार आहे.
( हेही वाचा: या दोन बँकांचे होणार खासगीकरण; येत्या महिन्यात निर्णय )
टूर ऑफ ड्युटी योजना म्हणजे काय
एका ठराविक कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याला टूर ऑफ ड्युटी म्हटले जाते. टूर ऑफ ड्युटी कन्सेप्ट नवीन नाही. दुस-या युद्धानंतर ब्रिटीश वायूदलाने टूर ऑफ ड्युटी योजना आणली होती.
Join Our WhatsApp Community