सैन्यभरतीत कोणत्या पदांसाठी काय हवी शैक्षणिक पात्रता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

लष्करामध्ये विविध दलांसाठी विविध पदे, स्तर आणि कामांसाठी भरती प्रक्रिया असते. त्यामध्ये दरवर्षी सुमारे ५० ते ६० हजार सैनिक भरती होत असतात. महाराष्ट्रातून सुमारे ५ ते ६ हजार तरुण लष्करी सेवेत दाखल होत असतात. ही भरती प्रक्रिया पारदर्शी असून तेथे भ्रष्टाचार नसतो, असे सांगत यासाठी तरुणांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी रविवारी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्यावतीने रविवारी, ९ जानेवारी २०२२ या दिवशी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ब्रिगेडियर महाजन यांनी सुभेदार मेजर हरिदास जाधव (निवृत्त) यांच्याशी संवाद साधला. यावेळी विविध पद भरतीसाठी काय निकष लागतात, त्याची तपशीलवार माहिती जाधव यांनी दिली.

(हेही वाचा कोविड रुग्णांचा पारा उतरला : दिवसभरात सहा हजारांनी घटली संख्या)

कोणत्या पदांसाठी किती शैक्षणिक आहर्ता गरजेची?

त्यांनी दिलेल्या सर्वसाधारण माहितीनुसार आवश्यक निकषांमध्ये उमेदवार १० वी पास साधारण ५० टक्के गुण मिळवणारा हवा. त्याचप्रमाणे उमेदवाराचे वय साडेसतरा ते २१ या दरम्यानचे हवे आणि उंची १६८ सेंमी आणि वजन ५० किलो हवे. तसेच छाती ७७ सेमी आणि छाती फुगवल्यानंतर ती ५ सेमी वाढणे गरजेचे आहे. काही पदांबाबत गुण आणि निकषही वेगळे आहेत. त्यामध्ये हाऊस किपिंगसारख्या कामासाठी उमेदवार ८ वी पास चालतो. तर क्लार्क – नर्सिंग आदी कामांसाठी असलेला जवान हा १० अधिक दोन वर्षे म्हणजे बारावी परीक्षा उत्तीर्ण हवा. त्यात इंग्रजी, गणित, अकाऊंट यांचेही चांगले ज्ञान त्याला हवे. तांत्रिक विषयातील पदासाठी १२ वी सायन्स पीसीएम पास झालेला हवा. त्याला ५० टक्के गुणांनी आणि प्रत्येक विषयता ४० टक्क्यांपेक्षा अधिक गुणानी तो पास झालेला असणे गरजेचे आहे, असे जाधव म्हणाले. त्यांनी या भरतीसाठी आतापर्यंत ९० जणांना प्रशिक्षित केले असून त्यापैकी ४५ जणांनी सैन्यात प्रवेश मिळवला आहे. या संबंधातील कोचिंगबद्दल माहिती देताना जाधव म्हणाले की, परीक्षेसाठी पुस्तकेही असून दरवर्षी त्यातील प्रश्न आणि अन्य अभ्यासक्रम नव्याने तयार करून पुस्तके प्रसिद्ध केली जातात. विविध पुस्तक दुकानांमध्ये ती मिळतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here