खाण कामगार Charles Bronson झाला अमेरिकेचा अभिनेता

130
चार्ल्स ब्रॉन्सन (Charles Bronson) ल्युथिनियामधील कोळसा खाण कामगाराच्या १५ मुलांपैकी ११वा मुलगा होता. १६व्या वर्षी तो स्वतः खाण कामगार झाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही की दुसर्‍या महायुद्धात त्याने यूएस आर्मी एअर फोर्समध्ये एअरक्राफ्ट गनर म्हणून काम केले होते. युद्ध संपल्यानंतर सुरुवातीच्या काळात तो वाईट मार्गालाही लागला होता. नंतर फिलाडेल्फिया थिएटर कंपनीने त्याला सीनरी रंगवण्याचे काम दिले. हे काम करत असताना त्याने छोट्या छोट्या भूमिका केल्या आणि अखेर १९४९ तो कॅलिफोर्नियाला गेला.
चार्ल्स ब्रॉन्सन (Charles Bronson) चे मूळ नाव आहे Charles Dennis Buchinsky. त्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९२१ रोजी एहरनफेल्ड, पेनसिल्व्हेनिया, यू.एस. येथे झाला. ब्रॉन्सनने ’यू आर इन द नेव्ही नाऊ (१९५१) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि पुढील काही वर्षांमध्ये त्याने अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. मिस सॅडी थॉम्पसन (१९५३), अपाचे (१९५४), आणि ड्रम बीट (१९५४) यांसारख्या बी-फिल्ममध्ये त्याने अभिनेता म्हणून मोठ्या भूमिका साकारल्या.
बळकट शरीरयष्टीचा कठोर अभिनेता म्हणून त्याची ओळख होती. द मॅग्निफिसेंट सेव्हन (१९६०), द ग्रेट एस्केप (१९६३), द डर्टी डझन (१९६७) या चित्रपटातील त्याच्या भूमिका गाजल्या. ब्रॉन्सन नावाचा वापर असलेला बिग हाऊस, यू.एस.ए. (१९५५) हा त्याचा पहिला चित्रपट होता. मशिन गन केली (१९५८) मध्ये त्याने प्रमुख भूमिका केली आणि अनेक दूरदर्शन मालिकांमध्येही तो झळकला. दि मग्निफिसेंट सेव्हन (१९६०), दि ग्रेट एस्केप (१९६३), दि डर्टी डझन (१९६७) या चित्रपटातील त्याच्या भूमिका लक्षात प्रेक्षकांच्या राहिल्या आहेत.
१९७६ मध्ये ग्रेट डिप्रेशनच्या काळात ब्रॉन्सनने हार्ड टाइम्समध्ये बॉक्सरची भूमिका साकारली आणि त्याच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव झाला. त्यानंतर त्याने अनेक ऍक्शन थ्रिलर चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. लव्ह अँड बुलेट्स (१९७९), द इव्हिल दॅट मेन डू (१९८४), आणि मर्फीज लॉ (१९८६) असे अॅक्शन-थ्रिलर चित्रपट त्याने गाजवले. अखेर ३० ऑगस्ट २००३ रोजी लॉस एंजेलिस येथे त्याचा मृत्यू झाला. पण जाजगाचा निरोप घेण्याआधी एक खाण कामगार अमेरिकेचा अभिनेता झाला. हा त्याचा प्रवास खरोखरच अद्भूत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.