- ऋजुता लुकतुके
मिनी कूपर गाडीचा जगभर खास असा चाहता वर्ग आहे. बीएमडब्ल्यू कंपनीची ही कार अनोखी स्टाईल, रंग आणि चोख कामगिरी यासाठी नावाजलेली आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या मिनी कूपर कारच्या पाचव्या पिढीतील नवीन एसई कार भारतातही लाँच केली होती. आता याच गाडीचा इलेक्ट्रिक अवतार किंवा इलेक्ट्रिक बहीण भारतात येणार आहे. एसई आणि ई अशा दोन्ही गाड्या इलेक्ट्रिक स्वरुपात येणार आहेत. त्यासाठी कंपनीने जर्मन कंपनीशी करार केला आहे. (Mini Countryman SE)
(हेही वाचा- वादग्रस्त IAS Pooja Khedkar प्रकरणात थेट पीएमओकडून आला महत्त्वाचा आदेश!)
जुन्या गाडीत आधुनिकता आणून कंपनीने नवीन डिझाईन तयार केलं आहेत. त्यात गोल हेडलाईट्स हा कंपनीचा ट्रेडमार्क आहेच. पण, यावेळी ग्रील थोडं अधिक आकर्षक आणि नेटकं आहे. तर गाडीचं बंपर इतकं साधं आणि सोपं ठेवण्यात आलं आहे की, तिथं कसलाही गजबजाट नाही. दोन पारंपरिक हेडलाईट्स आणि मिनी कूपरचा लोगो फक्त ठळकपणे दिसतो, इतकं बंपरचं डिझाईन साधं आहे. (Mini Countryman SE)
Also receiving its official pricing is the new U25 MINI Countryman, available in all-electric SE and hot petrol JCW variants. Read more here.https://t.co/hYsLTILbsa
— Paul Tan’s Automotive News (@paultan) July 12, 2024
कारची चाकं पूर्णपणे बदलली आहेत. आणि ही चाकं थोडी रुंद आहेत. गाडीची पाठची बाजू काही प्रमाणात बदलली आहेत. इथं आता टेल लाईट्सचा आकार बदललाय. दोन्ही दिवे एलईडी आहेत. या गाडीचं इंजिन २ लीटरचं पेट्रोल टर्बो इंजिन असेल. आधीच्या तुलनेत नवीन कार थोडी जास्त ताकदवान आहे. आणि ० ते १०० किमींचा वेग ही गाडी फक्त ०.१ सेकंदांत गाठू शकते. (Mini Countryman SE)
(हेही वाचा- Sudhir Mungantiwar : सरकार गड-किल्ल्यावरील अतिक्रमण हटवणार; मद्यप्राशनावरही कठोर निर्बंध)
४ जणांची आसन क्षमता असलेली २ दरवाजांची ही गाडी ५३ लाखांपासून भारतात सुरू होते. (Mini Countryman SE)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community