मुंबईत पारा घसरला! तर दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील हवेचा कसा आहे दर्जा?

गेल्या काही दिवसांपासून थंडगार वा-यांसह मुंबईकरांचा दिवस सुरु होत असताना शनिवारी थंडी अजूनच वाढल्याचा अनुभव आला. शनिवारी मुंबईतील किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. उपनगरात राहणा-या अनेकांना शनिवारची सकाळ चांगलीच गारठवणारी ठरली. शनिवारी सकाळी माझगाव आणि चेंबूर येथे हवेचा दर्जा ढासळला असल्याची नोंद सफर या ऑनलाईन प्रणालीत झाली. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा जास्त खराब होत असताना शनिवारी दिल्लीत ३१६ तर मुंबईत २१५ हवेचा दर्जा होता. दिल्लीतील वायू प्रदूषण अतिखराब तर मुंबईतील वायूप्रदूषण खराब असल्याचे सफरच्यावतीने जाहीर करण्यात आले.

(हेही वाचा – सीमावाद सुरु असतानाच बोम्मईंचं पुन्हा ट्विट; म्हणाले, ‘… कोणतीही तडजोड करणार नाही’)

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई तसेच किनारपट्टीतील किमान तापमानात घसरण होत असल्याने सकाळी आणि सायंकाळी गारेगार वा-यांचाही अनुभव येत आहे. मुंबईतील आरे किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात प्रभातफेरीसाठी बाहेर पडणा-यांना सकाळी चांगलीच हुडहुडी भरली. सांताक्रूझच्या तुलनेत कुलाबा येथील वेधशाळेच्या स्थानकात किमान तापमान जास्त होते. कुलाबा येथे किमान तापमानाची नोंद २० अंश सेल्सिअसपर्यंत झाली. वेधशाळेच्या दोन्ही केंद्रात किमान तापमानात चार अंशाचा फरक होता. उपनगरातील बराचशा ठिकाणी हवेचा दर्जा शनिवारीही चांगला नव्हता. त्यामुळे मुंबईभरात प्रवास करण्यापूर्वी तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले. नवी मुंबईतही हवेचा दर्जा १६६ वर नोंदवला गेला. नवी मुंबईत प्रवास करतानाही या भागांत आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईतील स्थानके

अतिखराब वर्गवारीतील स्थानके – प्रतिक्युबिक मीटरमध्ये

  • माझगाव – २१५
  • चेंबूर – ३०१

खराब वर्गवारीतील स्थानके – प्रति क्युबिक मीटरमध्ये

  • मालाड २८०

ठिक वर्गवारीतील स्थानके

  • भांडूप – १६९
  • अंधेरी – १४९

समाधानकारक वर्गवारीतील स्थानके – प्रति क्युबिक मीटरमध्ये

  • कुलाबा – ९८
  • वरळी ८१
  • बोरिवली ८३

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here