राज्यमंत्री बच्चू कडू यांची भगूर येथील वीर ‘सावरकर वाड्या’ला भेट

नाशिक येथील भगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असणाऱ्या वाड्याला महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी बच्चू कडू यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी स्मारकासह तेथील सर्व छायाचित्रे आवर्जून पाहिली.

बच्चू कडू यांनी स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्णन करुन अभिवादन केले आणि ‘स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्त्रोत रक्तरंजीत लढ्याचे सैनिक स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझा मानाचा मुजरा’, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. बच्चू कडू यांना मनोज कुवर यांनी सावरकर जन्मस्थान स्मारकाची सविस्तर माहिती दिली. तसेच ‘सहा सोनेरी पाने’, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक बच्चू कडू यांना भेट दिले.

सावरकर जन्मस्थान स्मारकाच्या वतीने मनोज कुवर यांनी बच्चू कडू आणि त्यांच्यासह आलेल्या इतर नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. भगूरच्या नगराध्यक्षा अनिताताई करंजकर आणि भगुर नगर परिषदेचे सर्व नगरसेवकांनीही भगूरवासीयांच्या वतीने बच्चू कडू यांचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्षा अनिताताई करंजकर, प्रशांत लोया, संभाजी देशमुख, भगूरचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – अबब…टोमॅटो १०० रुपये किलो! पेट्रोलच्या दरालाही टाकले मागे)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here