बहुचर्चित मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी सभागृहाच्या बैठकीत दिली.
(हेही वाचा – भारतरत्न लतादिदींच्या अंत्यविधीवर १ कोटींचा खर्च)
गेल्या १२ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याचा मुद्दा आमदार सुनील प्रभू, भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री चव्हाण म्हणाले, भूसंपादनासाठी लागलेला कालावधी, अनेक नैसर्गिक आणि तांत्रिक अडचणींवर मात करीत या महामार्गाचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
गणेशोत्सवाआधी सर्व खड्डे बुजवणार
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशात गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने चाकरमान्यांचे प्रवासहाल होऊ नयेत, यासाठी या महामार्गावरील सर्व खड्डे चतुर्थीपूर्वी बुजवले जातील, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. तसेच कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन स्वतः या कामाची येत्या चार दिवसांत पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community