राज्यात गेल्यावर्षी मार्चपासून आलेल्या कोरोना संकटामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले. आता हळूहळू निर्बंध शिथिल होत असले, तरी आजही अनेक कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमवर भर दिला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शक्य असेल तरच कार्यालये सुरू ठेवा अन्यथा वर्क फ्रॉम होमवर भर द्या, असे आदेश दिले होते. मात्र वर्क फ्रॉम होम जसे खासगी कंपन्यांनी मनावर घेतले, तसेच खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनीही मनावर घेतल्याचे दिसते. त्याचे कारण म्हणजे ठाकरे सरकारमधील बरेचसे मंत्री हे मागील वर्षापासून आपल्या बंगल्यात बसूनच कारभार हाकताना पहायला मिळत आहेत. पण त्यांच्यामागे फायली घेऊन फिरताना अधिका-यांची मात्र चांगलीच वरात निघत आहे.
मंत्रालयात मंत्री दिसेनात
राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून हाकला जातो आणि ज्या मंत्रालयात सरकारमधील मंत्री बसतात, त्या मंत्रालयात मात्र सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे. ठाकरे सरकारमधील बऱ्याचशा मंत्र्यांनी सरकारी बंगल्यावरुन काम करायला सुरुवात केल्याने, मंत्रालयात ना मंत्री बसतात, ना त्या-त्या विभागाचे अधिकारी.
(हेही वाचाः बदल्यांसाठी पवारांच्या बंगल्यावरुन फोन आल्याने मंत्रालयात उडाली खळबळ)
अधिकारी त्रस्त
ठाकरे सरकारमधील बरेचसे मंत्री हे बंगल्यावर बसून काम करत असल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. काही अधिकाऱ्यांशी खासगीत बोलले असता, त्यांनी देखील मंत्री मंत्रालयापेक्षा बंगल्यावरुन कामकाज करण्यावर भर देत असतात. त्यामुळे सकाळी मंत्रालयात येऊन मग कामासंदर्भातील फाईल्स बंगल्यावर घेऊन जाव्या लागत असल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. मंत्र्यांचे बंगले हे मलबार हिल परिसरात असल्यानेही सर्वाधिक धावपळ होत असल्याचे अधिकारी खासगीत सांगतात.
मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकले नाहीत
सगळ्यात महत्त्वाचे म्हणेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्क फ्रॉम होम चांगलेच मनावर घेतले आहे. मुख्यमंंत्री गेल्या वर्षीपासून मंत्रालयात फिरकलचे नाहीत. आपल्यामुळे सुरक्षा व्यवस्था, प्रशासन आणि राजकीय मंडळींची धावपळ होऊन, गर्दी होण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्कफ्रॉम होमवरच भर दिला आहे. महत्त्वाच्या बैठका ते वर्षा आणि सह्याद्रीवरच घेतात. तर ते मातोश्रीवर फेसबूक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधत आहेत. यावरुन मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका देखील झाली.
(हेही वाचाः आरोग्यमंत्र्यांनी बंद केली शिक्षणमंत्र्यांची ‘शाळा’)
Join Our WhatsApp Community