धक्कादायक! पुण्यात महिला कबड्डीपटूची मैदानातच निर्घृण हत्या

मयत मुलगी ही इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे, असे समजते.

पुण्यातील बिबवेवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. येथे मैदानात कबड्डी खेळणाऱ्या अल्पवयीन कबड्डीपटूवर अज्ञाताने कोयत्याने सपासप वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. भर मैदानात गर्दीच्या ठिकाणी असा निर्घृण हत्या झाल्यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरला आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

नेमके काय घडले? 

मयत मुलगी ही इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे, असे समजते. या आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. ही मुलगी बिबवेवाडी परिसरात मैदानात कबड्डीचा सराव करत होती. त्यावेळी मारेकरी तिच्या जवळ आले आणि त्यातील एकाने कोयत्याने तिच्या फक्त मानेवरचा सपासप वार करायला सुरुवात केली. एकामागोमाग एक असे वार झाल्यामुळे मुलीचा जागेवरच मृत्यू झाला.

(हेही वाचा : एसटीत आत्महत्येचे सत्र सुरूच! २३व्या आत्महत्येने महामंडळ हादरले!)

मोठी माणसे पळाली, लहानगी खेळत राहिली! 

विशेष म्हणजे या मैदानात आजूबाजूला छोटी मुले आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केले. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुले मात्र आजूबाजूला खेळत होती. मात्र अन्य नागरिकांनी घटनास्थळारुन थेट पळ काढला. या हत्याकांडामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट

खुन्याकडे पिस्तुलही होते, मात्र त्याने कोयत्याने निर्घृण हत्या केली. खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

चित्रा वाघ यांचा सरकारवर निशाणा 

या प्रकरणाचा भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध करत राज्य सरकारवर निशाणा साधला. याविषयी त्यांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “अतिशय भयानक… पुण्यात काय चाललंय ? कोयत्याने वार करून खून करण्यात आला. टाईप करतानाही अंगावर काटा येत आहे. त्या मुलीने काय भोगलं असेल..? राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पोलिसांचे कायदे फक्त कागदावर आहेत. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत. यांच्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय ?”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here