मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी खांबित यांच्या गाडीवर गोळीबार

मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी कारवर गोळीबार करून पळ काढला.

110

मीरा भाईंदर महापालिकेतील कायम चर्चेत असलेले वजनदार अधिकारी दीपक खांबित यांच्या गाडीवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. बोरिवली पूर्व येथील नॅशनल पार्क येथील करीब कृष्णा इमारत येथे ही घटना घडली. त्यावेळी नगर पालिकेचे अधिकारी हे घटनास्थळी उपस्थित होते. त्याच वेळी पोलिसही त्याठिकाणी पोहचले.

मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी कारवर गोळीबार करून पळ काढला. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नसून ही घटना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलिस तसेच कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी, तसेच पोलिस उपायुक्त दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू झाले. हा गोळीबार करणारे दोघे काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आले होते. ज्या मोटारीवर गोळीबार केला, त्यात मीरा भाईंदर महापालिका अधिकारी बसले होते. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. विशेष म्हणजे घटनास्थळापासून काही अंतरावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे जुने घर आहे.

(हेही वाचा : सीडब्ल्यूसी घोटाळा: स्थायी समितीने का राखून ठेवला प्रस्ताव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.