Mirra Alfassa: योगी अरविंद यांच्या फ्रेंच शिष्या मिर्रा अल्फासा

171
Mirra Alfassa: योगी अरविंद यांच्या फ्रेंच शिष्या मिर्रा अल्फासा
Mirra Alfassa: योगी अरविंद यांच्या फ्रेंच शिष्या मिर्रा अल्फासा
मिर्रा अल्फासा(Mirra Alfassa) म्हणजेच श्री मां या नावाने ओळखल्या जाणार्‍या फ्रेंच वंशाच्या भारतीय आध्यात्मिक गुरू होत्या. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मिर्रा अल्फासा असे होते. त्यानंतर योगी अरविंद यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्याकडून प्रेरित होऊन त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. अरविंद त्यांना श्री मा म्हणून लागले, म्हणून त्यांचे इतर अनुयायीही त्यांना श्री मा म्हणून हाक मारु लागले.(Mirra Alfassa
२९ मार्च १९१४ रोजी श्री मा पाँडिचेरी येथील आश्रमात योगी अरविंद यांना भेटल्या आणि त्यांना भारतीय गुरुकुलातील वातावरण आवडले. त्यांचा हिंदू धर्माकडे कल वाढू लागला. मात्र पहिल्या महायुद्धात त्यांना पाँडिचेरी सोडून जपानला जावे लागले. तिथे त्यांना गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर भेटले आणि त्यांना हिंदू धर्मातील साधेपणा जाणवला.(Mirra Alfassa
२४ नोव्हेंबर १९२६ रोजी मिर्रा अल्फासा पाँडिचेरीला परतल्या आणि यावेळी त्यांनी निश्चय केला होता. त्या अरविंद यांच्या शिष्य झाल्या. श्री मा यांनी त्यांचा ३० वर्षांचा अनुभव पुस्तकरुपाने कथन केला आहे, या पुस्तकाचे मूळ इंग्रजी नाव आहे ‘द अजेंडा’… अरबिंदो त्यांना दैवी मातेचा अवतार मानायचे. पुढे त्यांनी ‘द मदर’ नावाचा प्रबंध लिहिला.(Mirra Alfassa)
श्री मा यांचा जन्म २१ फेब्रुवारी १८७८ रोजी पॅरिस येथे झाला. त्यांचे वडील यहुदी होते आणि आई इजिप्ट वंशाची होती. ५ वर्षांच्या असतानाच त्यांना अध्यात्मात आवड निर्माण झाली. १३ व्या वर्षी तर त्यांना तंत्र-मंत्र अवगत झाले होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी ’द पाथ ऑफ लेटर ऑन’  हे रहस्यमय पुस्तक लिहिले. १६ व्या वर्षी त्यांनी नाटक कंपनीत देखील काम केले होते. (Mirra Alfassa)
प्रसिद्ध इटालियन कुक हेन्री मॉरिसेटशी यांच्या विवाह झाल्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला. पुढे त्यांनी स्वामी विवेकानंदांनी लिहिलेले पुस्तक वाचले. इथून त्यांची भारतीय संस्कृती, सभ्यता, धर्म जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. मग त्यांनी भगवद्गीतेचा फ्रेंच अनुवाद वाचला होता. आणि अशाप्रकारे त्यांचा अध्यात्मिक प्रवास सुरु झाला आणि शेवटी त्यांना अरविंद यांच्या रुपात गुरु मिळाले. (Mirra Alfassa)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.