लाल समुद्रातून भारतात येणाऱ्या जहाजावर शनिवारी, (२७ एप्रिल) क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. एंड्रोमेडा स्टार असे या जहाजाचे नाव आहे. हे जहाज रशियातून तेल घेऊन भारतात येत होते. या हल्ल्यात जहाजाचे किरकोळ नुकसान झाल्याचे जहाजाच्या मास्टरने माहिती देताना सांगितले. (Missile Attack)
अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांडनुसार, शुक्रवारी, सायंकाळी ५.४९वाजता ही घटना घडली. हे जहाज ब्रिटनचे होते आणि ते अँटिग्वा आणि बार्बाडोसचा ध्वज फडकवत होते. हल्ला झाला तरी ते आपल्या मार्गावरून पुढे जात होते. रशियातील प्रिमोर्स्क येथून या जहाजाचा प्रवास सुरू झाला आणि ते गुजरातमधील वाडीनारला पोहोचणार होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
(हेही वाचा – Mihir kotecha : मिहिर कोटेंचांची संपत्ती वाढली, काय आहे कारण)
भारतात येणाऱ्या जहाजावर २ वेळा हल्ला
भारतात येणाऱ्या जहाजावर २ वेळा हल्ला करण्यात आला. यादरम्यान हुथींनी अनेक क्षेपणास्त्रे डागली, मात्र पहिल्या हल्ल्यात डागलेली क्षेपणास्रे जहाजावर न पडता जवळच्या समुद्रात पडली. दुसऱ्या हल्ल्यात जहाजाचे नुकसान झाले. समुद्रातील जहाजावरील हल्ला अनेक दिवसांच्या शांततेनंतर अचानक झाला. याआधी इस्रायलसोबतच्या तणावादरम्यान इराणने होर्मुझ खिंडीतून भारताकडे येणारे जहाज ताब्यात घेतले होते. ते परवानगीशिवाय त्यांच्या सागरी हद्दीत घुसल्याचे इराणने म्हटले होते. जहाजाच्या क्रू मेंबर्समध्ये १७ भारतीय आणि २ पाकिस्तानी होते.
इराणने पाकिस्तानचे दोन नागरिक आणि भारतातील एका महिला क्रू मेंबरची सुटका केली. तर उर्वरित १६ भारतीय अजूनही इराणमध्ये कैदेत आहेत. शुक्रवारी, हुथींनी केवळ भारतात येणाऱ्या जहाजांनाच नव्हे तर अमेरिकेच्या एमक्यू-9 रीपर ड्रोनलाही लक्ष्य केले. येमेनच्या सादा प्रांतात हुथींनी क्षेपणास्त्र हल्ला करून ड्रोन पाडले आहे.
अनेक जहाजांनी आपला मार्ग बदलला…
इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यासाठी हुथी बंडखोर लाल समुद्रातील जहाजांवर सातत्याने हल्ला करत आहेत. त्यामुळे अनेक जहाजेही आपला मार्ग बदलत आहेत. हुथी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि ब्रिटनने मिळून येमेनमधील हुथी स्थानांवर आतापर्यंत ४ वेळा हवाई हल्ले केले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर गंभीर परिणाम होत आहे. अशी माहिती अमेरिकन मीडिया ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community