मिशन चांद्रयान ३! इस्त्रोची तयारी पूर्ण, काही महिन्यांत लॉंचिंग

द्रयान ३ मिशनची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून आवश्यक चाचण्यांसह सर्व तयारीही अंतिम टप्प्यात असून लॉंचिंगसाठी अनुकूल स्लॉटची प्रतिक्षा करण्यात येत असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी नागपूरमध्ये दिली. जून ते जुलै दरम्यान चांद्रयान ३ अंतराळात सोडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

( हेही वाचा : गुजरातची बोट रत्नागिरीच्या समुद्रात बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू)

मिशन चांद्रयान ३ 

चांद्रयान २ प्रमाणे यंदाचे उद्दिष्ट सुद्धा सारखेच आहे गेल्यावेळी ज्या चुका झाल्या त्या टाळून यानने सुरक्षित लॅडिंग आणि त्यानंतर रोटर सुरक्षित बाहेर निघावे याकडे विशेष भर देण्यात येणार आहे. चांद्रयान ३ मध्ये प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा काम करू शकले असे नियोजन करण्यात आले आहे तसेच यातील सॉफ्टवेअर, सेन्सर, तंत्रज्ञान हे अधिक अपग्रेडेड असेल असेही अध्यक्षांनी सांगितले.

२०२३ च्या शेवटी मानवरहित गगनयान अंतराळात जाणार

गगनयान हे मानवरहित यान या वर्षाच्या शेवटी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. गगनयानाच्या पूर्व तयारीसाठी जगभरात १० वर्षांचा कालावधी लागतो पण भारताने हे लक्ष्य ४ वर्षात पूर्ण करण्याचे ठरवले आहे. यासाठी चार चाचण्या घेण्यात येणार असून यापैकी २ चाचण्या सध्या हाती घेण्यात आल्या आहेत असेही इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here