आमदार निधीतून करता येणार गृहनिर्माण सोसायटीत ‘ही’ विकासकामं

जाणून घ्या कोणती आहेत ती कामं

325

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या कामांमध्ये आता गृहनिर्माण सोसायट्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत प्रत्येक विधिमंडळ सदस्याला वर्षाला अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या नव्या नियमावली नुसार आमदारांना आपल्या विभागातील गृहनिर्माण सोसायटीत सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रीक व्हेहिकल चार्जर सेंटर, रस्त्याचे बांधकाम, जॉगिंग ट्रॅक, छोटे उद्यान, ट्री गार्ड तसेच सीसी टीव्ही कॅमेरे आदी बसवण्याची सुधारित तरतूद करण्यात आली आहे.

आमदाराला ५० लाखांपर्यंत खर्च करता येणार

शहरी/ नागरी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही विधीमंडळ सदस्यांनी, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी व नागरी भागात कामे सुचविण्यास तथा कामे करण्यास आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या विद्यमान मार्गदर्शक सुचनांमुळे मर्यादा येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार विद्यमान नियम आणि कार्य पद्धतीत सुधारणा तथा बदल करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने निर्णय घेत मार्गदर्शक तत्वे बनवली. याला शासनाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार ९ प्रकारच्या कामांचा समावेश त्यात केला आहे.

(हेही वाचा – ED ने राऊतांना बजावले दुसरे समन्स, १ जुलैला हजर राहण्याचे निर्देश)

यामध्ये एका गृहनिर्माण सोसायटीत आमदाराला ५० लाखांपर्यंत खर्च करता येऊ शकतो. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जागेत नऊ विविध घटकातील कोणतीही कामे करावयाची झाल्यास कामाच्या एकूण खर्चामध्ये संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांचा वाटा किमान २५ टक्के राहील व आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कमाल ७५टक्के निधी खर्च करता येऊ शकेल.

प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर ५०% आमदार निधी

प्रत्येक विधीमंडळ सदस्यांना एका आर्थिक वर्षात रु.२.५० कोटीच्या मर्यादेत गृहनिर्माण संस्थांच्या जागेत कामे सुचविता येतील. प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर ५०% आमदार निधी वितरीत करण्यात येईल. काम पूर्ण झाल्यानंतर गृहनिर्माण संस्थेच्या हिश्याची २५% रक्कम खर्च झाल्याचे प्रमाणपत्र व काम पुर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर उर्वरित २५% निधी वितरीत करण्यात येईल. काम मंजूर करण्यापुर्वी संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या किमान २५% वाट्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात उपलब्ध असल्याचे तसेच सदर रक्कम प्रस्तुत प्रयोजनार्थ खर्च करण्यास संस्था तयार असल्याचे संस्थेच्या सक्षम पदाधिकाऱ्यांनी (संस्थेचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार) प्रमाणित करणे आवश्यक राहील.

आमदार विकास निधीतून गृहनिर्माण सोसायटीत करण्यात येणारी कामे

  •  रेन वॉटर हार्वेस्टींग
  • घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया करणे. घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणे
  • सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारणी करणे
  • सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालकीच्या परिसरात सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबतची यंत्रणा बसविणेसाठी आर्थिक सहाय्य देणे
  • विजेची गरज भागविण्यासाठी सोलर सिस्टीम बसविणेसाठी अर्थसहाय्य देणे
  • इमारतीचे छतावरील (Root Top) सौर विद्युत संच व जमीनीवरील सौर विद्युत संच
  • सौर पंपाची बसवणे
  • स्वयंपाकासाठी सौर ऊर्जेवर आधारीत संयंत्र आस्थापना
  • सौर उष्णजल संयंत्रे आस्थापना
  • सोसायटीच्या आवारात सौर दिवे बसविणे
  • सहकारी गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर ईलेक्ट्रीक व्हेईकल चार्जंग सेंटर तयार करणे,
  • टाकावू प्लास्टीकचा वापर करुन रस्त्यांचे डांबरीकरण,
  • रस्त्यांच्या बांधकामासाठी Geo Synthetics चा वापर करणे.
  • Fly Ash चा वापर करून रस्त्यांचे बांधकाम करणे.
  • डांबरीकरणासाठी परिवर्तीत डांबराचा वापर (Polymer) modified natural rubber modified) करणे तसेच Stone Matrix Asphalt चा वापर तसेच पर्यावरणपुरक Cold Mix Technology चा वापर करणे.
  • रस्त्यांच्या बांधकामासाठी ज्युटचा वापर, नारळाच्या काथ्याचा (Coir) वापर करणे
  • सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील पदपथावर (Footpath) पेव्हर ब्लॉक (गट्टू) बसविणे
  • सहकारी गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर जॉगींग ट्रॅक तयार करणे, सदर जॉगींग ट्रक किमान १०० मिटरचा असावा.
  • ग्रीन जिम / खुली व्यायाम शाळा व्यायामासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करणे. सामान्य नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा साहित्य लहान मुलांना खेळणी स्थापित करणे, छोटे मैदान इ. कामांस अर्थ सहाय्य देणे.
  • जेष्ठ नागरिकांसाठी बेंचेस बसविणे / कट्टा बांधणे
  • सहकारी गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर हरितपट्टा (Green Cover) तयार करणे. यामध्ये छोटे उद्यान (vertical Gardens), मडमॅकडम ट्रॅक तयारकरणे. २. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाकरीता ट्री गार्ड बसविणे, वृक्षलागवड करताना स्थानिक वृक्षांना प्राधान्य देण्यात यावे.
  • बालोद्यान तयार करणे.
  • सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच अग्निरोधक व्यवस्था प्रस्थापित करणे
  • सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था करणे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.