केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आमदार सुहास कांदे उच्च न्यायालयात

राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवले. त्याविरोधात कांदे यांनी कायदेशीर सल्ला घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात कांदे कायदेशीर लढा देणार असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले. मत बाद केल्यानंतर, आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केला नसल्याचा आरोप कांदे यांनी याचिकेत केला आहे.

सुहास कांदे यांनी मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर, ती घडी न घालता तशीच ठेवली असल्याने, त्यांचे मत रद्द करण्यात आले होते. मत बाद करण्यावरच कांदे यांचा आक्षेप आहे. चुकीच्या पद्धतीने मत बाद केले असून, याबाबत माझी बाजू ऐकून न घेताच निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.

( हेही वाचा: पुण्यात जिवंत काडतुसे आणि बुलेट सापडली; पंतप्रधानांच्या दौ-यापूर्वी पोलिसांची कारवाई )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here