९ मेट्रो मार्गांकरिता ‘MMRDA’ने घेतले ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज

131

मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्वाकांक्षी मेट्रो मार्गिका हाती घेतल्या आहेत. सद्यस्थितीत प्रगतीपथावर असलेल्या व प्रस्तावित मेट्रो मार्गिकांपैकी ९ मेट्रो मार्गिकांसाठी निधी उभारण्याकरीता केंद्र सरकारच्या आर.ई.सी. लिमिटेडकडून ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले, समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी टप्पा कधी होणार सुरू?)

त्यातील १४ हजार ४३४ कोटी विद्युत आणि यांत्रिकी व संबंधित कामांकरीता, तर १६ हजार ४९ कोटी रुपये विद्युत आणि यांत्रिकी कामांकरीता आहेत. या कर्जाच्या करारपत्रांवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

एमएमआरडीएची १५३ वी बैठक मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच झाली. या वेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी केले.

मुंबईसह महानगराचा कायापालट होणार

– मुंबई, ठाणे व नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच या शहरांचा विकास करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पांच्या कामाकरीता १७ हजार २१४.७२ कोटी इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
– सदर प्रकल्पांचा सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.
– ठाणे शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी रायलादेवी तलाव सुशोभिकरणाच्या कामास ३९.३१ कोटी प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

बुलेट ट्रेनला गती

  • मुंबई – अहमदाबाद जलदगती रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील प्राधिकरणाची जमीन नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लि. (एन.एच.एस.आर.सी.एल.) यांना केलेल्या हस्तांतरणास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
  • अंबरनाथ नगरपरिषद, कुळगांव बदलापूर नगरपरिषद आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्राधिकरणामार्फत राबविण्यास व या प्रकल्पास प्राधिकरणामार्फत व्यवहार्यता तफावत निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.