कोकणात राज ठाकरे Raj Thackeray यांची शनिवारी रत्नागिरी येथे सभा होत आहे. सभेसाठी मुंबईतील दहिसर येथून येणाऱ्या एका पदाधिकाऱ्याचा कारच्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर जवळ तुरळ येथे घडली
मुंबईच्या दहिसर येथील शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी, असे अपघातात मृत्यू झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याच नाव आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकाला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी मनसेच्या पदाधिकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी धाव घेतली आहे. मुंबई येथील मनसेच्या शाखा क्रमांक ५चे उपाध्यक्ष होते. मनसे पदाधिाऱ्याच्या निधनाची बातमी समजताच मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांनी रुग्णालयात धाव घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांची रत्नागिरीत जाहीर सभा होत आहे. यासाठी मुंबई येथील मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोकणात दाखल झाले आहेत. यापैकीच मुंबईतील दहीसर येथून आपल्या ताब्यातील इनोव्हा कार घेऊन येत असताना तुरळ येथील सद्गुरू सेवा केंद्राजवळ चालक ऋषीकेश राणे याचा कारवरील ताबा सुटला आणि भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या देवेंद्र साळवी यांना रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या कारमधील चेतना हर्षल सावंत, प्रकाश मोरे, ऋषीकेश राणे हे सहप्रवाशी किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवेंद्र साळवी हे मुंबईतील बोरीवली दहीसर परिसरातील मनसेचा सक्रिय पदाधिकरी होते.
(हेही वाचा The Kerala Story : अमरावतीत कोणतेही विरोध, निदर्शने नाहीत, पोलिस बंदोबस्तात ‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित)
Join Our WhatsApp Community