लढायचं ते जिंकण्यासाठी! असे म्हणत मनसेची जोरदार तयारी

114

पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी पुणे महापालिका निवडणुकीत अधिक लक्ष घातले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतील. 7 ते 10 मार्च या दरम्यान राज ठाकरे पुण्यात असतील. राज ठाकरे या दौऱ्यात मनसेचे कार्यक्रम, मनसेचा वर्धापन दिन, पिंपरी चिंचवड दौरा या कार्यक्रमांना उपस्थित असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा 9 मार्चला असतो. यावर्षी पहिल्यांदा मुंबईबाहेर वर्धापन दिन सोहळा होणार आहे.

( हेही वाचा : #RussiaUkraineWar चर्चेची तिसरी फेरी! जाणून घ्या भारताची भूमिका )

पोस्टर्सवर नवा संदेश

पुण्यात स्वारगेट येथे नेहरू स्टेडियमजवळील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात मनसेच्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेने आता महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. वर्धापन दिनासाठी मनसेने खास पोस्टर तयार केले आहेत. या पोस्टर्सवर लढायचं ते जिंकण्यासाठी! असे नमूद करण्यात आले आहे. तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी चांगलेच सक्रिय झाले असून त्यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.