तुम्ही जर पेटीएमद्वारे मोबाईल रिचार्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण पेटीएमने अलीकडेच रिचार्जवर अतिरिक्त चार्ज आकारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी PhonePe ने आपल्या ग्राहकांसाठी रिचार्जवर अतिरिक्त शुल्क लागू केले होते. त्यानंतर आता पेटीएमने देखील अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. हे शुल्क 1 रुपये ते 6 रुपयादरम्यान आहे. या अतिरिक्त चार्जची रक्कम मोबाईल रिचार्जच्या रकमेवर अवलंबून असणार आहे. हा नियम सर्व पेटीएम मोबाईल रिचार्जवर लागू होणार आहे. पेमेंटची पद्धत कार्ड, UPI किंवा वॉलेट असू शकते.
(हेही वाचा – MSRTC: काय आहे ‘एसटी’ची ‘विशेष बस सेवा’? जाणून घ्या नवे दर)
युजर्सनी ट्विटरवर दिली माहिती
अनेक युजर्सनी ट्विट करून सांगितले की, पेटीएमने मोबाईल रिचार्जवर अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. युजर्सना हे अपडेट मार्चच्या अखेरीपासून मिळू लागले होते. मात्र आता मोठ्या संख्येने युजर्सना हे अपडेट मिळत आहेत. सध्या 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर हे शुल्क आकारले जात आहे. 2019 मध्ये पेटीएमने सांगितले की, ते त्यांच्या युजर्सकडून अतिरिक्त शुल्क आकारत नाही. पण आता अनेक यूजर्सना मोबाईल रिचार्जवर अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
50 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर आकारले जाते शुल्क
Paytm प्रमाणे, PhonePe देखील आपल्या युजर्सना मोबाईल रिचार्जवर शुल्क आकारते. हे शुल्क 50 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर आकारले जात आहे. कंपनीने सांगितले की, हे शुल्क कमी प्रमाणात आकारले जाणार आहे, जेणेकरून युजर्सना कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच, पेटीएममध्ये, वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे लोड करण्यासाठी 2% शुल्क भरावे लागते. सध्या या नियमात डेबिट कार्ड आणि यूपीआय जोडले गेले नसल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community