अनिरुद्ध ब्रह्मभट्ट यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३७ रोजी पाटण, गुजरात येथे झाला. (Anirudh Brahmabhatta) त्यांनी वडोदरा येथून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. १९५८ मध्ये त्यांनी एम.एस. विद्यापिठातून गुजराती आणि संस्कृत हा विषय घेऊन बीए पूर्ण केले.
१९६० मध्ये त्यांनी याच विषयात एमए उत्तीर्ण केले. तसेच १९५९ मध्ये दाभोईच्या कला महाविद्यालयात अध्यापनाला सुरुवात केली आणि नंतर बिलीमोरा येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते भूमिका मासिकाचे संपादक होते.
(हेही वाचा – Pune – Bangalore Highway Accident : चार वाहनांचा अपघात; दोघांचा मृत्यू)
एम.एस. युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असतानाच त्यांनी लेखनाला सुरूवात केली. ते आधुनिक गुजराती कवी आणि समीक्षक होते. त्यांच्या कलाकृतींचे हिंदी, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. अन्विक्षा हे त्यांचे समीक्षणात्मक पुस्तक आहे ज्यात २४ निबंधांचा समावेश आहे. (Anirudh Brahmabhatta)
पूर्वापर हा त्यांच्या गुजराती दैनिक जन्मभूमीमधील ‘आलापझलप’ या स्तंभातील लेखांचा संग्रह आहे. पुरुंदर हे त्यांचे आणखी एक समीक्षणात्मक पुस्तक आहे. सन्निकर्ष (1982) हे त्यांचे मरणोत्तर प्रकाशित झालेले समीक्षणात्मक साहित्य आहे.
(हेही वाचा – Acharya J. B. Kripalani : महान क्रांतिकारक आचार्य जे.बी. कृपलानी)
अनिरुद्ध ब्रह्मभट्ट यांनी अनेक कथा सुद्धा लिहिल्या आहेत. त्यांच्याच आवाजातील त्यांचे साहित्य श्राव्य स्वरुपात (ऑडिओ) https://www.ekatrafoundation.org/ वेबसाईटवर उपलब्ध आहे. गुजराती साहित्यातील त्यांचे योगदान आभाळाएवढे आहे. ३१ जुलै १९८१ रोजी ल्युकेमियामुळे अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले. (Anirudh Brahmabhatta)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community