#PIBFactCheck : मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांना FREE लॅपटॉप? वाचा काय आहे सत्य…

प्रत्येक मिळवणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार असल्याने राज्य आणि केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त देऊन आर्थिक सहाय्य देखील करण्यात येते. दरम्यान, केंद्र सरकारकडून देशभरातील तब्बल ५ लाख विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याच्या योजनेचा मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये फ्री लॅपटॉपची लिंकही देण्यात आली आहे. मात्र या व्हायरल होणाऱ्या मेसेजचे सत्य पीआयबीने ट्विट करत सांगितले आहे.

(हेही वाचा – Indian Railway: ट्रेनच्या बोगीवर असलेल्या ‘या’ पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?)

काय आहे व्हायरल होणारा मेसेज?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय, यामध्ये भारत सरकारकडून ५ लाख मोफत लॅपटॉप वितरित करण्याच्या योजनेबद्दल सांगितले आहे. या मेसेजमध्ये असे म्हटले की, केंद्रीय शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप करत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि मुलांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. तुम्ही या फ्री लॅपटॉप योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे जाणून घ्या खालील लिंकवर क्लिक करा, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा काय आहे सत्य…

दरम्यान, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) आपल्या फॅक्ट चेक ट्विटर हँडरवर या व्हायरल होणाऱ्या मेसेजची सत्यता सांगितली आहे. सोशल मीडियावर जो मेसेज व्हायरल होतोय, तो फेक असल्याचे या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून अशी फ्री लॅपटॉप वाटप योजनेची कोणतीही योजना चालवली जात नसल्याचा खुलासा त्यांनी यामध्ये केला आहे. त्यामुळे अशा खोट्या व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर आणि त्यात दिलेल्या लिंकवर चूकनही क्लिक करू नका. यामुळे तुम्ही ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकू शकतात, त्यामुळे सावध राहण्याचे आवाहनही पीआयबीकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here