स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि शिवराज्याभिषेक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनी सोमवार दिनांक १ मे २०२३ या दिवशी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये एकाचवेळी आणि एकाच दिवशी सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा तसेच मोडी लिप्यंतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मोडी लिपीच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ११ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची ठिकाणे आणि तेथील संबंधित व्यक्तींचे संपर्क खालील प्रमाणे आहेत.
( हेही वाचा : World Malaria Day : मलेरिया डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘इको बायो ट्रॅप’`चा पायलट प्रोजेक्ट)
मोडी लिपी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधा…
१) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, दादर, शिवाजी पार्क मुंबई ४०००२८ संपर्क सुनील कदम – ९८६९२२०२२३ / ०२२-२४४६५८७७,
२) पुणे येथे संपर्क – संदीप कान्हेरे – ९८९०६००७०८,
३) अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय, अहमदनगर , संपर्क- संतोष यादव – ९३७२१५५४५५,
४) कोल्हापूर येथील संपर्कासाठी (कोल्हापूर – नाईट कॉलेज) नवीनकुमार माळी – ९४२००३९४९४
( हेही वाचा : fake gold loan scam : नकलीला ठरवले असली; आपल्याच व्यक्तीकडून बॅंक फसली)
यावेळी काही तांत्रिक कारणामुळे नाशिक केंद्र समाविष्ट केले गेलेले नाही. नाशिकमधील मोडी लिपी अभ्यासक मुंबई, पुणे किंवा नगर येथील केंद्रावर स्पर्धेसाठी सहभागी होऊ शकतात. प्रवेशपत्रे ही संबंधित केंद्रावरच भरावयाची असून ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्याची मुभा देण्यात आलेली नाही. दूर अंतरावर राहणारे स्पर्धेच्याच दिवशी अर्धा तास आधी प्रवेश शकतील, पुस्तक विक्रेत्यांनाही मोडीविषयक पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यास आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्यांनी स्पर्धकांनी स्वतःचे पेन, बोरू, टाक, पेन्सिल, खोडरबर, फूट पट्टी आणि धरावयास पॅड स्वत: आणावे. स्पर्धकांना कागद पुरवले जातील. काळ्या शाईचा वापर अनिवार्य आहे. सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेकरिता देवनागरी लिपीत उतारा दिला जाईल तो मोडी लिपीत लिहावयाचा आहे. अक्षर चुका ग्राह्य धरल्या जातील. शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धेकरिता एक पेशवेकालीन कागद असेल आणि त्यासाठी एक तास दिला जाईल. पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. स्पर्धा निकाल प्रक्रियेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील. अधिक माहितीसाठी वर दिलेल्या व्यक्तींशी मोबाईल आणि फोन क्रमांकावर संपर्क साधावा.
Join Our WhatsApp Community