दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह 9 बड्या सरकारी अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी सिलव्हासा येथील जिल्हाधिकारी संदिप कुमार सिंह यांनाही आरोपी करण्यात आले होते.
(हेही वाचा- राऊतांच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्या, न्यायालयाचे ईडीला आदेश)
दरम्यान, मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये गेल्या वर्षी २२ फ्रेब्रुवारी रोजी पंख्याला लटकून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता, मात्र हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये गेल्या वर्षी २२ फेब्रुवारी रोजी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. डेलकर यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला असून दादरा नगर हवेलीच्या खासदाराने मुंबईत ही आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच गुजरातीमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सतत मानसिक छळ होत असल्याचे लिहिले होते.
Join Our WhatsApp Community