अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी २३ फेब्रुवारीला माजी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना अटक केली होती. या अटकेला एक वर्ष पूर्ण होऊनही मलिकांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या आठवड्यात मलिकांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी मलिकांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, मंगळवारी सुनावणी झाली, परंतु आता मलिकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी बुधावरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
मलिकांची किडनी निकामी झाल्याची वकिलांनी दिली माहिती
मंगळवारी मलिकांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत वकील अमित देसाईंनी मलिकांची किडनी निकामी झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांची एक किडनी निकामी झाली आहे.’ यावेळी अमित देसाई यांनी जे.जे. रुग्णालयाचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘कोठडीच्या कालावधीतच मलिकांची किडनी निकामी झाली. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या विचार करून जामीन मंजूर करावा.’
अमित देसाईंच्या युक्तिवादानंतर मात्र न्यायालयाने ही सुनावणी बुधवारपर्यंत तहकबू केली आहे. त्यामुळे आता बुधवारच्या सुनावणीत मलिकांना जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – बीएमसीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश)
Join Our WhatsApp Community