अनेक सिनेमांत तुम्ही पाहिले असेल की, मोठ्या नेत्यांच्या आणि बड्या बिझनेसमनच्या घरी छापेमारी होते. त्या छापेमारीत कधी घराच्या छतात, तर कधी भिंतीत पैसे लपवण्यात आल्याचे उघड होते. पण, आता ख-या आयुष्यात सिनेमाच्या एखाद्या सीनसारखे दृश्य पाहायला मिळाले आहे. एका छापेमारीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पाण्याच्या पाईपमध्ये लपवलेले पैसे शोधण्यात यश आले आहे. हा पाईप फोडला असता चक्क नोटाच खाली पडू लागल्या. ही घटना आहे कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील.
करोडोंची बेहिशेबी मालमत्ता
कर्नाटकात सार्वजनिक बांधकाम खात्यात 30 वर्षे कनिष्ठ अभियंता पदावर काम करणा-या शांतनगौडा बिरादरच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. तेव्हा करोडो रुपयांची बेहिशेबी संपत्ती व मालमत्ता आढळली. त्यात दोन मोठे बंगले, ३५ एकर जमीन आणि मोठे फार्म हाऊस या संपत्तीचा समावेश आहे. अन्य मालमत्तांची मोजणी अजून सुरु आहे.
पाइप फोडताच नोटा लागल्या पडू
बिरादरने घरात लपवलेले पैसे शोधताना कर्मचारी अक्षरश: थकून गेले. त्यांना ४० लाख सहज सापडले. त्याने १३ लाख रुपयांची रोकड भिंतीच्या पाइपमध्ये लपवली होती. आतमध्ये पाणी नव्हे, तर नोटाच भरल्या होत्या. पाइप फोडताच नोटाच खाली पडू लागल्या. पाइप उघडण्यासाठी पोलिसांनी प्लंबरला बोलावून आणले होते. शांतनगौडा बिरादरने ३० वर्षांत दोनच जिल्ह्यांत काम केले आहे.
(हेही वाचा: भारतात प्रथमच जन्मदरात महिलांनी मारली बाजी! )
Join Our WhatsApp Community