मुंबईच्या पश्चिम उपनगरातून दहशतवाद्याना अर्थ पुरवठा! ‘डी कंपनी’च्या दोघांना अटक 

150

एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) ने डी-कंपनी विरोधात सुरू केलेल्या कारवाईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक छोटा शकील याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणातील एनआयएने केलेली पहिलीच अटक

मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ अबुबकर शेख (वय ५९) आणि शब्बीर अबुबकर शेख (वय ५१) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. हे दोघे मुंबईच्या पश्चिम उपनगरातून डी- कंपनीसाठी शकीलाच्या इशाऱ्यावरून बेकायदेशीर काम करत होते. इतकेच नाही तर मुंबईत बसून ते दोघे दहशतवाद्याना अर्थ पुरवठा करणे यासारखे कृत्य करत अल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील एनआयएने केलेली ही पहिलीच अटक असून या दोघांना शुक्रवारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – NIA च्या अतिरिक्त महासंचालकपदी अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती)

दोघेही एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर होणार

दरम्यान, पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे सिंडिकेट चालविणारा शकील शेख उर्फ छोटा शकील याच्या विरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. छोटा शकील याचा  खंडणी,  ड्रग्सची तस्करी, हिंसक कृत्य, तसेच दहशतवादी कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची माहिती एनआयएने दिली आहे. अटक करण्यात आलेले आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख हे दोघे शकीलच्या सांगण्यावरून डी-कंपनीसाठी काम करीत होते, या दोघांच्या अटकेमुळे छोटा शकीलला हादरा बसला असून या दोघांच्या संपर्कात असणाऱ्याना देखील लवकरच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. आज, शुक्रवारी या दोघांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.