विनापरवाना घोरपड बाळगल्याचे प्रकरण आले अंगलट

100

विनापरवाना घोरपड बाळगणे तसेच मुक्त करण्याप्रकरणी वनविभाग मुंबईतील आशा द होप फॉर एनिमल वेल्फेर ट्रस्ट या संस्थेच्या प्राणीप्रेमी संस्थेला नोटीस बजावणार आहे. संस्थेने घोरपड मिळाल्याची तसेच तिला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडल्याची माहिती वनविभागाच्या 1926 या हेल्पलाईनवर दिल्याचा दावा केला आहे.

(हेही वाचा – ‘या’ तारखेला ठरणार शिंदे गट पात्र की अपात्र, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी)

सोमवारी पवई येथील रहेजा विहार येथील रस्त्यावर घोरपड फिरत असल्याची माहिती संस्थेच्या हेल्पलाईनवर आली. त्यानुसार संस्थेचे कार्यकर्ते नवीन आणि किरण सोळंकी यांनी घटनास्थळी भेट देत घाेरपड पकडली. सायंकाळी घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडल्याचा दावा संस्थेच्यावतीने करण्यात आला. याबाबतची माहिती 1926 या वनविभागाच्या हेल्पलाईनवर दिली गेल्याचेही संस्थेने सांगितले.

1926 वर ही माहिती आलेली नाही असे वनविभागाने स्पष्ट केल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण आले. घोरपड वन्यजीव संवर्धन कायदा 1972 अंतर्गत पहिल्या वर्गवारीत संरक्षित आहे. घोरपड सापडल्यानंतर वनविभागाला माहिती दिली गेलेली नाही. घोरपड नैसर्गिक अधिवासात सोडण्याअगोदर शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे की नाही, याबाबतची माहिती न दिल्याने वनविभागाने प्राणीप्रेमी संस्थेवर आक्षेप नोंदवला आहे. ठाणे प्रादेशिक वनविभागाचे मुंबई विभागाचे वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांनी ही माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.