प्रतीक्षा संपली! केरळमध्ये मान्सूनचे आगमन; आता महाराष्ट्रात कधी?

252
केरळमध्ये मान्सूनचे आगमन; आता महाराष्ट्रात कधी?
केरळमध्ये मान्सूनचे आगमन; आता महाराष्ट्रात कधी?

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेय.

तब्बल एका आठवड्याच्या विलंबानंतर केरळात मान्सूनचे आगमन झाले आहे. लवकरच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे. नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्याने केली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये गुरुवार सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल ७ दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र यासाठी ८ तारीख उजाडावी लागली. तळकोकणात १६ जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

(हेही वाचा – Central Government : उडीद, तूर या खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास केंद्र सरकारची मंजुरी)

याबाबत माहिती देता भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण द्वीपकल्पात पाऊस पडेल. तसेच चक्रीवादळ क्षीण झाल्यानंतर दक्षिणेकडील द्वीपकल्पाच्या पलीकडे मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर, १२ जूनच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी प्रमाणात होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.