केरळपर्यंत आलेला मान्सून राज्यात आणि मुंबईत कधी पोहोचणार? जाणून घ्या…

142

वेधशाळेचा अंदाज चुकवत केरळमध्ये दोन दिवस उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना आता पुढील वाटचालीला तीन ते चार दिवसांचा विलंब लागणार आहे. त्यामुळे राज्यात नैऋत्य मोसमी वारे दाखल व्हायला ५ जूननंतरच मुहूर्त मिळेल, तर मुंबईत ७ जूनच्या अगोदर मान्सून दाखल होत नसल्याची माहिती हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी दिली. राज्यात शेतक-यांनी ५ जूनपर्यंत पेरणी करु नये, असे आवाहनही देवरस यांनी केले.

( हेही वाचा : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा गुरूवारी बंद!)

भारतीय वेधशाळेने आज जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, केरळात दाखल झालेले नैऋत्य मोसमी वारे उर्वरित भागांत, अरबी समुद्रातील मध्य भागांत, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील काही भागांत, बंगालच्या उपसागरातील मध्य आणि पश्चिमेकडील भागांत तसेच आग्नेयकडील राज्यात तीन-चार दिवसांत पोहोचतील. सध्या राज्यात मान्सूनपूर्व वातावरण दिसून येत आहे. राज्यातही आजपासून वावटळीसह पावसाला सुरुवात होत आहे. सध्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात अद्याप सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात असल्याचे हवामान अभ्यासक अक्षय देवरस सांगतात.

यंदाच्या आठवड्यात राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होत असली तरीही गुरुवारपासून कोकणात पावसाचा जोर वाढत असल्याचे संकेत भारतीय वेधशाळेने दिले. मुंबईतही यंदाच्या आठवड्यात ढगाळ वातावरणाने सुरुवात होत असली तरीही अधूनमधून शिडकावे सुरु होतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.