मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरूच…

मुसळधार पावसाने शुक्रवारीही मुंबई व जवळच्या भागांला चांगलेच झोडपले. मुंबईत दुपारनंतर पावसाने जोर धरला. मात्र गुरुवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी होता. रात्रभर मुंबईत पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने काही भागांत शंभर मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.

जाणून घ्या पावसाच्या नोंदी

सायंकाळी सातच्या नोंदीनुसार, कुलाब्यात २९ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण मुंबईतील भायखळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महालक्ष्मी आदी परिसरांत पावसाची संततधार सुरु होती. भायखळ्यात सायंकाळी सात वाजता ९५.५ मिमी , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ५३.५ मिमी, महालक्ष्मी परिसरात ३९.५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातुलनेत पश्चिम उपनगरांत जुहू विमानतळ परिसरात ५९.५, मुंबई विमानतळ परिसरांत ७४ मिमी, वांद्रे येथे ६७.५ मिमी, राममंदिर येथे ८८.५ मिमी पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत सांताक्रूझमध्ये ५१.२ मिमी पावसाची नोंद होती. उपनगरीय भागांत सायंकाळी सात वाजता विद्याविहार येथे ७२.५ मिमी तर चेंबूर टाटा पॉवर परिसरात ४१.५ मिमी पाऊस झाला.

रात्री अकरावाजेपर्यंत वरळी, पवई, कुलाबा, सांताक्रूझ, मुलुंड, ठाणे यांसह नवी मुंबईतही पावसाची संततधार राहील. गेल्या सहा तासांत नवी मुंबईतील काही भागांत ६० मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. ठाण्यातही ४० ते ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here