ऋजुता लुकतुके
मूनलायटिंग (Moonlighting) हा प्रकार पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. यावेळी माहिती – तंत्रजान कंपन्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. तर आयकर विभागानेच मूनलायटिंगचा संशय असलेल्या हजारांच्या वर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मिळकत उघड करून त्यावर आयकर न भरल्यामुळे नोटीस पाठवली आहे. अर्थात, ही माहिती त्यांना कर्मचाऱ्याच्या पॅन क्रमांकासह माहिती तंत्रझान कंपनीनेच दिली असल्याचं बोललं जातंय.
आता पाढवलेली (Moonlighting) नोटीस ही प्राथमिक स्वरुपाची चौकशी करणारी नोटीस आहे. यामध्ये ५ ते १० लाख रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळवलेले कर्मचारी गृहित धरण्यात आले आहेत. यातली बहुतेक प्रकरणं ही २०१९-२०२२ तसंच २०२०-२१ या आर्थिक वर्षातील आहेत.
याच कालावधीत कोरोनामुळे जवळ जवळ अख्खं जग घरून काम करत होतं. आणि तेव्हाच मूनलायटिंग (Moonlighting) शक्य झालं.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारा व्यतिरिक्त मोठी रक्कम मिळाली असेल आणि ही मिळकत त्यांनी आयकर विभागापासून लपवली असेल तर असे कर्मचारी सध्या विभागाच्या (Moonlighting) रडावर आहेत. विशेष म्हणजे अशी अतिरिक्त मिळालेली रक्कम ही अनेकदा पगारापेक्षा जास्त असते.
मूनलायटिंग म्हणजे काय?
तुम्ही एखाद्या संस्थेत पूर्ण वेळ काम करून तिथे नियमित पगार घेत असताना त्याच क्षेत्रातील दुसऱ्या एखाद्या कंपनीत फ्रीलान्स करणं आणि त्याचे अतिरिक्त पैसे घेणं म्हणजे (Moonlighting) मूनलायटिंग. दिवसाचे साधारण ८ ते १० तास तुम्ही एका संस्थेसाठी काम करता. कोरोनाच्या काळात घरून काम करताना अनेकांनी उरलेल्या वेळेत दुसऱ्या एखाद्या परदेशी कंपनीसाठी काम केलं आणि त्याचे पैसेही घेतले.
अर्थात ही गोष्ट त्यांनी आपल्याला पगार देणाऱ्या संस्थेपासून लपवून ठेवली. कोरोनानंतरही हा प्रकार सुरूच राहिला.
एकाच क्षेत्रात असलेल्या दुसऱ्या कंपनीसाठी असं काम करणं स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे यावर अनेक मतं अलीकडच्या काळात समोर आली आहेत. अनेकांना मूनलायटिंग (Moonlighting) अनैतिक वाटतं. टीसीएस, इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी मूनलायटिंगला विरोध केला. तर विप्रो, टेक महिंद्रासारख्या कंपन्यांनी मूनलायटिंगला उचलूनही धरलं.
(हेही वाचा – शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता स्वाभिमानीतही फूट ? रविकांत तुपकर दुसरा गट स्थापन करणार)
आताही आयकर विभागाला मिळालेली माहिती ही कर्मचारी पूर्णवेळ काम करत असलेल्या कंपनीनेच (Moonlighting) दिली आहे असा दाट संशय आहे.
आयकर विभाग कशाच्या बळावर पाठवतंय नोटीस?
कर्मचाऱ्यांनी केलेलं अतिरिक्त (Moonlighting) काम हे अर्थातच कंपनीपासून लपवून ठेवलेलं आहे. किंवा त्यांच्या वैयक्तिक लॅपटॉपवरून केलं आहे. अशावेळी आयकर विभाग या संशयित अतिरिक्त मिळकतीचा हिशोब ठेवणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?
यातले बरेचसे व्यवहार हे ऑनलाईन आणि बहुतेक वेळा परदेशातील बँक खात्यातून झाले आहेत. असे झालेले व्यवहार डेटा सुरक्षेच्या कायद्याच्या मदतीने शोधून काढण्याचं काम सध्या आयकर विभाग करत आहे. आणि यात पाच लाखांहून मोठे वार्षिक व्यवहार झाले असतील तर त्यांचा सखोल अभ्यास करून नोटीस (Moonlighting) पाठवण्यात येत आहे.
आयकर विभागाची मूनलायटिंगवर (Moonlighting) कोणतीही भूमिका नाही. पण, एखाद्याला अतिरिक्त उत्पन्न मिळत असेल आणि तो ते लपवत असेल तर ते शोधून काढण्याचा हा प्रयत्न आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community