पुन्हा तिच नदी तेच शहर; ४३ वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण! काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या…

153

गुजरातमधील मोरबी शहरातील मच्छु नदीवरील झुलता पूर रविवारी कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना झाली. या झुलत्या पूलावरील सुमारे ५०० लोक नदीत पडले. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेमध्ये १३४ लोकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. परंतु या भीषण अपघातामुळे गुजरातला आठवण झाली ४३ वर्षांपूर्वीच्या घटनेची…

( हेही वाचा : IND VS BAN : विराट कामगिरी! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने मोडला ‘हा’ रेकॉर्ड)

४३ वर्षांपूर्वीच्या वेदनादायक घटनेची आठवण 

मच्छू नदीचे धरण फुटल्याने ही दुर्घटना घडली होती. ११ ऑगस्ट १९७९ रोजी घडलेल्या या दुर्घटनेमुळे या संपूर्ण शहराचे रुपांतर स्माशनभूमीमध्ये झाले होते. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे फुटले अशी माहिती तेव्हाच्या वृत्तपत्रांमध्ये नमूद आहे. संततधार पावसाने स्थानिक नद्यांना पूर आल्याने हे मच्छू धरण ओव्हरफ्लो झाले होते.

११ ऑगस्ट १९७९ रोजी दुपारी ३.१५ वाजता ही घटना घडली. अवघ्या १५ मिनिटांत संपूर्ण शहर उद्धवस्त झाले. घरे, इमारती कोसळल्या लोकांना काहीही कळण्याच्या आत ही दुर्घटना घडली. यामुळे १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

तेव्हाच्या सरकारी आकडेवारूनुसार या दुर्घटनेत १४३९ लोक आणि १२ हजार ८४९ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. पुराचे पाणी ओसल्यानंतर भयानक दृश्य पहायला मिळाले. शहरात सर्वत्र मृतदेह दिसत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.