ह.भ.प. बंडातात्या कराडकरांवरील कारवाईच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठानचा मोर्चा 

धारकरी आणि वारकरी संप्रदाय यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते दत्त चौक, ते तहसील कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला.

81

राष्ट्र, धर्म, समाज यांना राष्ट्र म्हणून जगण्याची शक्ती मिळते ती शक्ती म्हणजे वारी आहे. अशा वारीला बंदी घालून शासनाने फार मोठा अपराध केला आहे. या अपराधाचे क्षालन करण्यासाठी राज्यकर्त्यांनी ह.भ.प. बंडातात्यांची पाय धरून क्षमा मागितली पाहिजे आणि त्यांची स्थानबद्धतेतून मुक्तता केली पाहिजे, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केली.

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक गावात विठ्ठलाची आरती करावी!

संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै या दिवशी धारकरी आणि वारकरी संप्रदाय यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते दत्त चौक, ते तहसील कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिल्यावर ते बोलत होते. पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विश्‍वजीत कदम हे चांगले आहेत, मात्र वारीच्या संदर्भात त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. संत हे काही वेतन घेऊन चाकरी करणारे लोक नाहीत. आषाढीपर्यंत वारी ज्या ज्या मार्गाने जाते, ज्या पालखीचे मुक्काम जिथे जिथे होतात, त्या त्या मुक्कामाच्या ठिकाणी त्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र यावे आणि कार्यक्रम करावा. याला शासन विरोध करेल, तो विरोध गावकर्‍यांनी मोडून काढावा. गावकर्‍यांनी भगवा झेंडा घेऊन एकत्र येऊन यावे. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तेथील गावकर्‍यांनी एकत्र येऊन विठ्ठलाची आरती करावी.’

sambhaji bhide1

(हेही वाचा : मंडळे, महामंडळे बनले पांढरा हत्ती! २० वर्षांपूर्वीचे वार्षिक अहवाल २०२१मध्ये केले सादर!)

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्याशी चर्चा!

या वेळी इतिहासप्रेमी के.एन्. देसाई, हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण कार्यवाह सागर आमले, केदार डोईफोडे, श्रीकृष्ण पाटील, डॉ. प्रवीण माने संप्रदायातील घन:शाम महाराज, संजय जाधव, पांडुरंग चव्हाण यांसह धारकरी, वारकरी, तसेच समाजातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते. धारकर्‍यांनी मोर्चाच्या आरंभी भगवा झेंडा, संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमा हातात घेतल्या होत्या. धारकर्‍यांच्या हातात भगवे ध्वज होते. मोर्चा झाल्यावर पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी धारकरी यांच्यासह ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

sambhaji bhide3

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.