सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हजारीपार

107

राज्यभरात गुरूवारी एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील रूग्णसंख्या हजारीपार गेली आहे. बुधवारच्या नोंदीत राज्यात १ हजार ४५ नवे रुग्ण आढळले असून ५१७ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. हा वेग असाच सुरु राहिला तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दर तीन-चार दिवसांनी थोडी घट दिसेल, अशी भीती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केली.

आरोग्य विभागाने व्यक्त केली भीती

गुरुवारी मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांच्या यादीत मुंबईत ७०४, ठाण्यात ८८, पुण्यात ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. तिन्ही शहरांत सातत्याने सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत सद्यस्थितीत ३ हजार ३२४, ठाण्यात ५५५, पुण्यात ३७२ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. या तीन शहारांखालोखाल रायगडातील रुग्णसंख्येनेही शंभरीचा आकडा पार केला. रायगडात आता १०६ कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या आहे.

( हेही वाचा : रेल्वे पोलीस दलाने केली 150 महिलांची सुटका)

दर दिवसाला हजारीपार रुग्णसंख्या आढळली तर लवकरच आकडेवारी पुन्हा १० हजारांचा आकडा पार करेल, अशी भीतीही आरोग्य विभागाने व्यक्त केली. आता राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ५५९ असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.