Netflix ठरला कोणत्या व्हायरसचा बळी? १०० दिवसांत गमावले २ लाख सबस्क्रायबर्स

189

प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ओटीटी व्यासपीठावरील मजकूर प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत असतो. पण नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार नेटफ्लिक्सला गेल्या तिमाहीत खूप मोठा तोटा सहन करावा लागला आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे. नेटफ्लिक्सने दोन लाख सदस्य गमावल्यानंतर, SpaceX चे संस्थापक आणि Tesla CEO जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलन मस्कने नेटफ्लिक्सला ‘वोक माइंड व्हायरस’चा बळी ठरवत, हे डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्म आता पाहण्यासारखे राहिलेले नाही, अशी घणाघाती टीका केली आहे.

एका यूजरने मस्कच्या ट्विटवर कमेंट करत लिहिले की, फक्त नेटफ्लिक्सच नाही तर, चित्रपट, व्हिडिओगेम्स, सर्वसाधारणपणे टीव्ही, हे सर्व ‘वोक’ ट्रेंडने प्रभावित आहे. ही कमेंट योग्य असल्याचे सांगत मस्क यांनी आपली प्रतिक्रिया दिली. खरं तर, नेटफ्लिक्सला गेल्या दशकात सर्वात मोठा धक्का बसला आहे, कारण जवळपास दोन लाख सबस्क्रायबर्स गमावले आहेत, ज्यामुळे त्याच्या शेअर्समध्ये 25 टक्के घट झाली आहे.

100 दिवसांत 2 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स कमी

अहवालानुसार, सुमारे 100 दिवसांत नेटफ्लिक्सचे 2 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स कमी झाले आहेत. या घसरणीनंतर, 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत Netflix सदस्यांची संख्या 22.16 कोटींवर आली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नेटफ्लिक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सबस्क्रायबर्सची संख्या कमी झाली आहे. मात्र या प्रकरणात, नेटफ्लिक्सने असे सांगितले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे त्याचे सबस्क्रायबर्स कमी झाले आहेत. इतकेच नाही तर कोरोना महामारीत आमच्या सेवेला मोठा तडाखा बसल्याचा दावा देखील नेटफ्लिक्सने केला.

‘वोक’ म्हणजे काय?

‘वोक’ म्हणजे वर्ण भेद आणि समाजातील इतर प्रकारच्या अत्याचार आणि अन्यायाविषयी जागरुक असणे होय. मस्क यांच्या मते ‘वोक माइंड व्हायरस’ चा फटका नेटफ्लिक्सला बसल्यानंतर नेटफ्लिक्स वोकबद्दल थोडे अधिक सावध झाले आहे, ज्यामुळे आता अधिक ओरिजनल कटेन्ट पाहण्यास मिळत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.