मुंबई लोकल ट्रेनमधून पडून गेल्या वर्षभरात एकूण 2 हजार 507 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात मध्य आणि पश्चिम मार्गासह रेल्वेतून पडून 700 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना खांबाला आदळल्याने झाले असल्याचे समोर आले आहे. अपघात होऊ नयेत, तसेच रेल्वे रुळ ओलांडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाढत्या रेल्वे अपघातांमध्ये निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे.
( हेही वाचा ‘या’ दहा देशांतील भारतीयांसाठी खास सुविधा; केंद्र सरकारने आखली योजना )
मध्य रेल्वे
रुळ ओलांडताना
- महिला- 77
- पुरुष- 577
रुळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू या शहरांमध्ये
- ठाणे स्टेशन- 127
- कुर्ला स्टेशन- 101
ट्रेनमधून पडून
- महिला- 31
- पुरुष- 479
सर्वाधिक मृत्यू
- कल्याण- 105
- ठाणे- 89
पश्चिम रेल्वे
रुळ ओलांडताना
- महिला- 39
- पुरुष- 425
सर्वाधिक मृत्यू
- बोरीवली -140
- वसई- 113
ट्रेनमधून पडून
- महिला- 21
- पुरुष -169
सर्वाधिक मृत्यू
- बोरीवली -40
- वसई -67