शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या फार्ममधील आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगवल्याची बाब समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील ३०० हून अधिक देशी कोंबडय़ा आणि बदके गेल्या काही दिवसांत मृत पावली आहेत. या कोंबडय़ा आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची बाब समोर आली आहे.
एक किमीच्या परिसरातील पक्षांची मोजनी सुरू
या धक्कादायक घटेनेनंतर, प्रशासनानंतर यामुळे प्रशासन सतर्क झाले असून क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील २३ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तसंच बाधित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघातील कोंबड्यांचे नमुने तपासण्याची मोहीम सुरु करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, शहापूरच्या फार्ममध्ये बर्डफ्लू आढल्यानंतर त्या फार्मपासून एक किलोमीटरच्या परीघात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. बर्ड फ्लू वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर एक किमीच्या परिसरातील पक्षांची मोजनी सुरू आहे. त्यामुळे पक्षी आणि अंडी नष्ट करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – ‘भाजपला भुतानं झपाटलंय’, संजय राऊत भडकले)
नागरिकांनी घाबरून जाऊ नये
शहापूर तालुक्यातील वाशिंद नजीक वेहळोली गावातील पोल्ट्री फार्म सोडून इतर कुठेही कोंबड्याना अशी लागण झाल्याचे निदर्शनास आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्व परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी, राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community