अनोखा प्रजासत्ताक दिन; ३७००हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती

गेल्या ३ वर्षाच्या यशस्वी परंपरेला अनुसरून यंदाही झील एज्युकेशन सोसायटीने अनोखा विक्रम साकारला. झील एज्युकेशन सोसायटी, नऱ्हे ही संस्था गेली २६ वर्षे शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृतीद्वारे मानवंदना दिली. हा उपक्रम २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता संस्थेच्या प्रांगणात साकारला गेला. या उपक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने संस्थेचे सचिव डॉ. जयेश काटकर यांच्या हस्ते झाली. संस्थेचे सचिव डॉ. जयेश काटकर यांनी तरुणांना सामाजिक भान आणि देशप्रेम जपण्याचे आवाहन केले.

झील एज्युकेशन सोसायटी नेहमीच अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्यात अग्रेसर राहिली आहे. या उपक्रमामध्ये संस्थेचे ३७००हून अधिक विदयार्थी सहभागी झाले होते. ५००हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाद्वारे “एकता आणि शांतता ” हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश सफल झाला आहे. या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना दिली.

(हेही वाचा – प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा; वाचा संपूर्ण भाषण)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here