राज्यात दिवसभरात कोरोनाचे ४ हजार रूग्ण

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत नवा विक्रम नोंदवला गेला आहे. राज्यात गुरूवारी 4 हजार 255 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2 हजार 879 कोरोना रुग्णांना गेल्या 24 तासात उपचारातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

( हेही वाचा : सर्वेक्षणात त्रुटी तरी इम्पेरिकल डेटासाठी सर्वेक्षण थांबवणार नाही! छगन भुजबळ यांची माहिती)

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 634 वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत 97.87 % टक्के घट झाली असून मुंबईत दरदिवसाला मृत्यूची नोंद होत आहे. गुरूवारी सुद्धा मुंबईत दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आठवड्याच्या सुरुवातीला एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा रायगडात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मुंबईत आता 13 हजार 5 एवढ्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल ठाण्यात 3 हजार 9 78, पुण्यात 1 हजार 453, पालघरमध्ये 625, रायगड 709, नाशकात 108 तर नागपुरात 269 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here