Google Trend: ठाकरेंना थेट आव्हान दिल्यानं पाकिस्तानसह ‘या’ ३३ देशात शिंदेंचा ट्रेंड टॉपवर

106

शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शिवसेनेविरोधातील बंडामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आले असून सध्या त्यांच्यासोबत ४५ हून आमदार गुवाहाटीला असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण देशात एकनाथ शिंदे पोहोचले असून कोण एकनाथ शिंदे याचा शोध घेतला जात आहे. याचे उत्तर मिळवण्यासाठी लोक थेट गुगलाच प्रश्न विचारत आहे.

(हेही वाचा – शिवसेनेच्या धमकीला शिंदेंचे उत्तर! कुणाला घाबरवता, कायदा आम्हालाही कळतो! )

देशात एकनाथ शिंदेंचा सर्च ट्रेंड ६४ टक्के

महाराष्ट्राशी संबंधित घडामोड असल्याने उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या तुलनेत देशात एकनाथ शिंदेंचा सर्च ट्रेंड ६४ टक्के आहे. तर शिवसेना आणि थेट उद्धव ठाकरेंना आव्हान केल्याने सध्या एकनाथ शिंदेची चर्चा सर्वत्र होताना दिसत असून पाकिस्तान आणि सौदी अशा मुस्लिम देशांमध्ये गेल्या तीन दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेंविषयी माहिती सर्च केली आहे.

कोणत्या देशात शिंदेंचा ट्रेंड

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगात तब्बल ३३ देशांत ३ दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्च करण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदे टॉपवर होते. तर या शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये या देशांचा समावेश आहे.
पाकिस्तानात ५४ टक्के,
सौदी अरेबियात ५७ टक्के,
मलेशिया ६१ टक्के,
नेपाळ ५१ टक्के,
बांगलादेश ४२ टक्के,
थायलंड ५४ टक्के,
जपान ५९ टक्के,
कॅनडात ५५ टक्के लोकांनी सर्च केले आहे.

कधी झाले शिंदे ट्रेंड

२१ जून रोजी दुपारी अडीच वाजता एकनाथ शिंदेंचा ट्रेंडवर होता. २२ जून रोजी ते सूरतवरून गुवाहाटीला गेल्यानंतर हा गुगल ट्रेंड आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. तर २२ जून रोजी दुपारी साडे बारावाजेपासून उद्धव ठाकरेंचा ट्रेंड सुरू होता. बुधवारी पत्रकार परिषदेनंतर रात्री साडे दहा वाजता ठाकरे सर्च ट्रेंडमध्ये एकनाथ शिंदेंच्या पुढे असल्याचे पाहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.