युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन गंगा’ नावाने मोठी बचाव मोहीम राबवली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निकट समन्वयाने, परराष्ट्र मंत्रालय भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इंडियन एअरलाइन्स देखील या बचाव मोहिमेत हातभार लावत आहे.
(हेही वाचा – ओबीसी आरक्षणाला धक्का नव्हे तर धोका! का म्हणाल्या पंकजा मुंडे?)
चार केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाऊन या मोहिमेला मदत आणि देखरेख ठेवण्यासाठी गेले आहेत. भारतीय नागरी विमाने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत घेऊन येत आहेत.
दोन दिवसांत 7400 हून अधिक लोकं मायदेशी
22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या बचाव कार्यांतर्गत आतापर्यंत 6200 हून अधिक लोकांना परत आणले आहे, ज्यात 10 विशेष नागरी विमानांद्वारे गुरुवारी आलेल्या 2185 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये बुखारेस्टहून (रुमानिया) 5, बुडापेस्टहून (हंगेरी) 2, कोसिसहून (स्लोवाकिया) 1 आणि झेझोहून (पोलंड) 2 विमानांचा समावेश होता. याशिवाय भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांनी आणखी काही भारतीयांना मायदेशी आणले. नागरी उड्डाणांची संख्या आणखी वाढवली जाईल आणि पुढील दोन दिवसांत विशेष विमानांद्वारे 7400 हून अधिक लोकांना मायदेशी आणले जाण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community