सावधान! ‘या’ महाविद्यालयाचा परिसर बनतोय दारूचा अड्डा!

77

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय हे प्रसिद्ध आहे. तरुणाईमध्ये फर्ग्युसन रस्ता हा फॅशन आयकॉनसाठी प्रसिद्ध आहेच. या परिसरामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयासोबतच बीएमसीसी महाविद्यालयासारखी शैक्षणिक संकुले आहेत. तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाचले आहे. कोरोना काळात महाविद्यालये बहुतांशी बंदच होती. तरी देखील एका धक्कादायक आकडेवारीमुळे खळबळ उडाली आहे. फर्ग्युसन मैदान ते फर्ग्युसन टेकडी परिसरात एका महिन्यात तब्बल आठशेहून अधिक दारूच्या बाटल्या सापडल्याची माहिती पुणे प्लॉग्गेर्स संस्थेने दिली आहे.

८००हून अधिक दारुच्या बाटल्या 

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुणे हे शहर महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून प्रचलित आहे, असे असूनही याच महाविद्यालयाच्या परिसरात व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

( हेही वाचा : मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये ८९ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे! )

फर्ग्युसन महाविद्यालय परिसरात सन २०२१ डिसेंबर महिन्यामध्ये ५०० बाटल्या आणि जानेवारी २०२२ मध्ये तब्बल ३५० बाटल्या सापडल्या आहे. ह्या सर्व बाटल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील आहे. बाटल्यांसह २५० किलो प्लास्टिक कचरा देखील जमा करण्यात आला आहे. ग्राउंड ते फर्ग्युसन टेकडी परिसरात एका महिन्यात या बाटल्या सापडल्या आहेत. याची स्थानिक प्रशासनाने दखल घेतली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.