कर्नाटकात पहाटेची अजान ऐकूच येणार नाही!

बंगळुरू येथील मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते, म्हणून त्याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयाने नोटीस पाठवताच वक्फ बोर्डाने मशिदींना रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे वाजवू नका, अशी नोटीस पाठवली आहे.  

240

मशीद आणि दर्गा येथून अजान म्हणताना लाऊड स्पीकरवरून मोठा आवाज होणार नाही याची काळजी घ्या, रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगा वाजवू नका, असा आदेश कुणी उच्च न्यायालय किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारने काढला नाही, तर दस्तुर खुद्द कर्नाटक वक्फ बोर्डाने बंगळुरूमधील १६ मशिदींसाठी काढला आहे. त्यामुळे तूर्तास तरी बंगळुरूमधील मशीद अथवा दर्ग्यातून पहाटे भोंगा वाजणार नाही आणि जनतेची साखरझोप मोडणार नाही.

काय म्हणतो कायदा?

कोर्ट, रुग्णालय आणि शिक्षण संस्था यांच्यापासून १०० मीटर परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, या परिसरात फटाके वाजवणे, लाऊड स्पीकर लावणे हा पर्यावरण कायदा १९८६ नुसार गुन्हा ठरतो. तसेच या व्यतिरिक्तच्या ठिकाणी ७५ डेसिबल पेक्षा अधिक ध्वनी निर्माण झाल्यास ध्वनी प्रदूषण कायदा २०००नुसार गुन्हा ठरतो.

वक्फ बोर्डाने का काढला आदेश?

  • बंगळुरूमधील थनिसंद्रा या भागातील १६ मशिदींतील लाऊड स्पीकरमधून अजानचा आवाज मोठा असतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते.
  • याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
  • या प्रकरणी न्यायालयाने राज्य शासन आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाला नोटीस बजावली.
  • राज्य प्रदूषण मंडळाने कर्नाटक वक्फ बोर्डला नोटीस पाठवली.
  • प्रदूषण मंडळाच्या नोटीसवरून वक्फ बोर्डाने मशिदींना नोटीस काढून नियमांचे पालन करण्याचा आदेश दिला.

(हेही वाचा : अजानच्या आवाजाने एकाग्रता जाते, गोव्यात मशिदीच्या भोंग्याचा आवाज न्यायालयाने दाबला!)

काय म्हटले आहे बोर्डाच्या नोटीसमध्ये?

  • मशिदीचा भोंगा रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाजवू नये.
  • दिवसभरात भोंगा ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करूनच वापरावा.
  • मशिदीच्या भोंग्याचा वापर केवळ अजानसाठी, कुणाचा मृत्यू झाल्यास त्याचे वृत देण्यासाठी करावा. त्यावरून भाषण किंवा प्रवचन देवू नये.
  • जुम्माच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम भोंग्याद्वारे करावा, पण तोही संबंधित क्षेत्रापर्यंत आवाज पोहचेल इतकाच भोंग्याचा आवाज असावा.
  • मशीद, दर्ग्यात ध्वनी प्रदूषण मापक यंत्र बसवून घ्यावे.
  • कार्यक्रमाच्या वेळी मशीद/दर्ग्याच्या भोवती फटाके फोडू नये.
  • मशीद, दर्ग्याच्या भोवती फळझाडे लावावीत आणि पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शांतता राहील, त्यासाठी प्रयत्न करावेत.

गोव्यातही न्यायालयाने लावला चाप!

नुकतेच गोवा – फोंडा येथे राहणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर वरूण प्रिलोकर यांनी ते वर्क फ्रॉम होम करताना दिवसातून ५ वेळा मशिदीतील भोंग्यांमधून अजान ऐकू येत असल्याने ध्वनी प्रदूषण होते, एकाग्रता भंग होते, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने गोव्यातील फोंडा भागातील ४ मशिदींच्या विश्वस्तांना ध्वनी प्रदूषण नियम पाळा अन्यथा भोंगे बंद करा, असा आदेश दिला.

(हेही वाचा : समलैंगिक विवाहासाठी आशीर्वाद मिळणार नाही! व्हॅटिकनचा निर्णय! पाश्चात्य देशांत खळबळ! )

अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंचीही तक्रार!

प्रयागराज येथील सिव्हिल लाईन येथे राहणाऱ्या अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. संगीता श्रीवास्तव यांनी त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मशिदीतून पहाटे ५.३० वाजता मोठ्या आवाजात अजान ऐकू येत असल्याने आपली झोप मोड होत आहे, यातून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे म्हटले आहे. त्यांनी यासंबंधीची तक्रार प्रयागराज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

महाराष्ट्रात मात्र उलट न्याय! 

मानखुर्द येथे राहणारी करिष्मा भोसले या तरुणीने तिच्या घराच्या बाजूला मशिदींवरील भोंग्यातून अजानचा मोठा आवाज ऐकू येत असल्याने त्रास होतो, ध्वनी प्रदूषण होते म्हणून ती आणि तिची आई थेट मशिदीमध्ये जाणून भोंग्याचा आवाज कमी ठेवा, असे म्हणाल्या. त्यामुळे स्थानिक मुसलमानांनी आकांडतांडव केला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले असता कलम १८८ अंतर्गत पोलिसांनी करिष्मा आणि तिच्या आईच्या विरोधात नोटीस बजावली. त्यांनी थेट मशिदीत जाण्याआधी पोलीस ठाण्यात येणे आवश्यक होते, असे पोलिसांनी उलट त्यांना सुनावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.